जी.के.एस.महाविद्यालय खडवली येथे ठाणे ग्रामीण पोलिस यांच्या टीमने विद्यार्थीनींना गुड टच आणि बॅड टच या बद्दल चित्रफित दाखवून केले जनजागृतीपर मार्गदर्शन !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थासंचलित जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली, येथे ठाणे ग्रामीण पोलीस टिटवाळा व खडवली पोलिस यांच्या पथकाने विद्यार्थ्यांनींना महिलांवर होत असलेल्या अत्याचार, शारीरिक व मानसिक त्रास याबाबत स्वसंरक्षणार्थ सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) प्रशिक्षण दिले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर, उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर तसेच पोलिस हवालदार श्री.औटी साहेब, महिला पोलिस निरीक्षक श्रीमती भागश्री मॅडम, श्रीमती रेश्मा मॅडम तसेच श्री. ढिगे साहेब उपस्थीत होते. प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याकरिता आलेल्या सर्व पोलिसांचा सत्कार प्रा. रसिका लोकरे मॅडम,श्री.कुंटे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कु.प्रणिता गायकवाड, कु. मयुरी दाभाणे, कु. रितिका मोरे, कु. सुमिता कोठे, कु. कावेरी राऊत, कु. दिव्या दाभाणे, कु. रिया सिंग, कु. मोहिनी राम जाधव, कु. कावेरी प्रभाकर जाधव, कु. प्रीती, श्री. रवींद्र, श्री. राजन, कु. ऋतुजा, श्री. गणेश सोनवणे, कु. साक्षी संतोष जाधव, श्री. सनी संदीप सातप, श्री. रोशन, श्री. जगन, श्री.अतुल, श्री विश्वास जाधव, श्री अभिजीत, सुभाष जाधव, श्री.प्रशिक आठवले व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment