Saturday, 11 October 2025

स्वामी भक्त धर्मेश गिरी यांच्यातर्फे श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा संपन्न !!

स्वामी भक्त धर्मेश गिरी यांच्यातर्फे श्री स्वामी समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळा संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           घाटकोपर विद्याविहार परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय असलेले समाजसेवक व श्री स्वामी समर्थ भक्त धर्मेश भूपत गिरी यांच्या विद्याविहार येथील कार्यालयात वक्रतुंड औरंगाबादकर यांच्या सानिध्यात श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरुपरंपरा वैश्वानर अवतार परमसद्गुरू श्री गजानन महाराजश्री यांच्या चिन्मय पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजतापासून विद्याविहार पश्चिम प्रीमिअर रोड येथील सी-२, स्कायलाइन वेलस्पेस, गिरीराज ग्रुप येथे पार पडला. यावेळी श्री स्वामी समर्थ परमसद्गुरूंचे पादुकांचे पूजन व दर्शन सोहळ्याला श्री स्वामी भक्त, गिरी परिवार, मित्रमंडळी, पोलीस अधिकारी आदीसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ मूर्ती, पादुकांचे विधिवत अभिषेक पूजन, होम हवन, आरती करून प्रसाद वितरण करण्यात आले. शेवटी धर्मेश व भावेश भूपत गिरी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे प्रदक्षिणा केली.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...