Saturday, 19 June 2021

राज्यात रुग्णसंख्येत घट !! रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के !! पण मृत्यूदर चिंताजनक १.९७ टक्के !!

राज्यात रुग्णसंख्येत घट !! रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के !! पण मृत्यूदर चिंताजनक १.९७ टक्के !!


मुंबई : राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९,६३,४२० तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३२,५९७ इतकी झाली आहे. राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,१७,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के एवढा आहे. राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

शनिवारी १०,३७३ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत ५७,१०,३५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

No comments:

Post a Comment