Thursday, 22 July 2021

कल्याण, टिटवाळा, खडवली पाण्यात, चारही नद्यांना पूर; सखल भाग जलयम, शेकडो लोकांना शाळांचा आधार !

कल्याण, टिटवाळा, खडवली पाण्यात, चारही नद्यांना पूर; सखल भाग जलयम, शेकडो लोकांना शाळांचा आधार !


कल्याण, (संजय कांबळे) : काल म्हणजे बुधवारी सांयकाळी कल्याण ग्रामीण, टिटवाळा आणि खडावली परिसरात झालेल्या ढगफुटी सद्ष मुसळधार पावसामुळे भातसा, काळू, उल्हास आणि बारवी नद्यांनापुर आला असून या नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवली येत असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वरप यथील सेक्रेट हार्ट स्कुल या नांगरीकांना मोठा आधार ठरली आहे.


कल्याण सह टिटवाळा, खडवली या परिसरात रविवार पासून पाऊस सुरू झाला आहे, तालुक्यातील भातसा, काळू उल्हास आणि बारवी या नद्या दुथडी भरुन वाहत होत्या, परंतु काल म्हणजे बुधवारी रात्री या परिसरात ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस पडला, यामुळे या चारही नदीच्या पाण्यात वाढ होऊन पुर आला, भातसा नदीकाठच्या खडवली, काळू नदी काठच्या टिटवाळा आदी भागातील लोकांना जवळपास च्या शाळेत सोय करण्यात आली, तर उल्हास नदीच्या काठावर असलेल्या आपटी, पावशेपाडा, रायते, कांबा, वरप, म्हारळ येथील सखल भागात पाणी भरले.


*रायता पुल पाण्याखाली- उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे पहाटे तीनच्या सुमारास कल्याण नगर मार्गावरील रायता पुल पाण्याखाली गेला, येथे गोवेली पोलीस चौकीचे पोलीस व रायते गावातील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे, विलास सोनावळे हे लोकांना मदत करत होते.


*स्थानिकांची मदत- रायते येथील सखल भागात पाणी भरल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या साहित्याची ने आण करण्यासाठी ते मदत करत होते. कांबा येथील मोरया नगर मध्ये भरले होते, कांबा ग्रामपंचायत कर्मचारी व इतर स्थानिक तरुण टायर्स ट्यूबच्या साह्याने त्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी नेत होते, अशीच परिस्थिती, वरप,म्हारळ येथे दिसून येत होती, या तिन्ही गावांचा परिसर पाण्यात गेला होता

*पत्रकार संजय कांबळे यांच्या घरात पाणी- उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे पत्रकार संजय कांबळे हे राहत असलेल्या ओम साईबाबा नगर भागात पाणी भरल्याने पत्रकार संजय कांबळे यांच्या घरात पाणी  भरले होते, या बरोबर गावभाग, शिवशक्ती नगर, दुर्गानगर, म्हारळ सोसायटी, गोदावरी नगरी, राधाकृष्णन नगरी, आण्णासाहेब पाटील नगर, आदी भागात पाणी भरल्याने अ़नेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

*सेक्रेट हार्ट शाळचा आधार- आज आलेल्या पुरामुळे बाधीत झालेल्या म्हारळ, वरप, कांबा येथील नागरिकांना यामध्ये वरप नदी काठचे लोक, मोरयानगर, सिमा रिसॉर्ट परिसर, वरप येथील लोकांना सेक्रेट हार्ट शाळेत निवारा देण्यात आला होता. येथे त्यांच्या चहा नास्ता ची सोय करण्यात आली होती, या शाळेचे व्यवस्थापक अलवीन अंथोंनी सर स्वतः लक्ष देत होते, त्यांचे कर्मचारी व इतर स्टाफ या पुरग्रस्ताकडे जातीने लक्ष देत होते, प्रत्येक वर्षी पुर असो, कोरोनाचे संकट असो अथवा कोणत्याही प्रकारचे संकट असो ही शाळा सदैव मदतीसाठी तत्पर असते.

No comments:

Post a Comment