Monday, 19 July 2021

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान,काळू,बारवी नदीवरील पुल पाण्याखाली, उल्हास नदी दुथडी,रस्ते पाण्यात !

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान,काळू,बारवी नदीवरील पुल पाण्याखाली, उल्हास नदी दुथडी,रस्ते पाण्यात !


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसापासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुदा पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, तर बारवी नदीवरील दहागाव पुल लवकरचं पाणी भरुन हा वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ, वरप, कांबा येथे पाणी साचल्याने येथील वाहतूक थप्प झाली आहे.


कल्याण तालुक्यात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूदा पुल आज सकाळी च पाण्याखाली गेला यामुळे परिसरातील १०/१५ गावांचा संपर्क तुटला. तसेच दहागाव बदलापूर रस्त्यावरील बारवी नदीचा पुल देखील लवकरचं पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्याची जिवनवाहिनी असलेली उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे मात्र पाऊस असाच पडत राहिला तर रायते पुल पाण्याखाली जाऊन कल्याण नगर रस्ता बंद होऊ शकतो.


सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ येथील थारवानी, रिजेन्शी, रोज वाईन ,टाटा पावर हाऊस,वरप येथील बंजरंग हार्ड वेअर, येथे रस्त्यावर १०/१५ पुटापर्यत पाणी साचल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर रांग लागली होती,

रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने तेही धोकादायक झाले होते, अनेक गावातील गटारे, नालेसफाई न झाल्याने भरभरुन वाहत होते, गावातील गल्ली, बोळाला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. असे चित्र सर्वच ठिकाणी दिसत होते, या पावसामुळे डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील डांबर कोठे वाहून गेले त्या बिचाऱ्या ठेकेदारालाच माहिती? एकूणच चित्र पाहता पावसाने आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाचे पितळ उखडे पाडले.

No comments:

Post a Comment