कृषितंत्रज्ञातील नाविन्यपूर्ण "ऍग्रीगेट" कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा संपन्न - महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ
ग्लोबल परळी आणि अटल प्रतिभा पोषण केंद्र - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने "ऍग्रीगेट" या कृषि क्षेत्रातील विशेष उपक्रमाचे दिनांक २ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन नीती आयोगाचे वाईस चेअरमन डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. तरी कार्यक्रमासाठी अटल इनोवेशन मिशन चे डायरेक्टर डॉ. चिंतन वैष्णव, ग्लोबल परळीचे संस्थापक मयंक गांधी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे महासंचालक रवींद्र साठे यांच्या संबंधित कार्यक्षेत्रातील विशेष निमंत्रित उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांनी अनेक सदिच्छा देत उपक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
ऍग्रीगेट हा अनोखा उपक्रम ग्रामीण विकास आणि गतिशील उत्पादन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया, नवकल्पनांचा उपयोग करून शेतकऱ्यांसह शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी, शेतकरी, कृषी प्रारंभ आणि तंत्रज्ञान यांच्यातील दरी कमी करते. ग्रामीण व शहरी भारतातील दरी कमी करणारा एक उपक्रम म्हणून ऍग्रीगेट हा प्रकल्प उभा राहत आहे. हे तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेले शेतकरी आणि ज्यांना वास्तविकतेविषयी माहिती नसलेले स्टार्ट-अप उद्योजकांना एकत्र आणते. ८०००+ हुन अधिक शेतकरी, ९० लाख फळझाडे आणि १४०००+ एकर शेतात त्यांची कल्पना, सर्जनशीलता आणि व्यवसाय योजना या उद्योजकांची वाट पाहत आहेत.
ग्लोबल परळी आणि अटल प्रतिभा पोषण केंद्र - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या कार्यक्रमासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि विकास इत्यादी संदर्भात काम करू पाहणाऱ्या नोंदणीकृत स्टार्टअप उद्योजकांना तसेच संबंधित उद्योगांना थेट शेतकऱ्यांसोबत संलग्न होऊन अनुभवी तज्ञांच्या माग्रदर्शनाखाली या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एक सुवर्ण संधी या निमित्ताने निर्माण होत आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या उपक्रमासाठी दि २२ जुलै २०२१ रोजी पर्यंत Https://www.agrigateindia.in/apply-now/ या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जात आहेत. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट देता येईल.
आदर्श भालेराव :
मो. 8070705552

No comments:
Post a Comment