कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई चा आगडोंब !
कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या संकटामुळें आधीच सर्व सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता महागाई गगणाला भिडत असल्याने गोरगरीब व कष्टकरी जनतेचे जगणे मुस्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नावाने शिव्या शाप देत गँस परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या असून गेल्या कित्येक वर्षांपासून दिसेनासा झालेला धूर गावा गावातील झोपड्या मधून दिसू लागला आहे.
देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्य काळात गोरगरीब, कष्टकरी शेतमजूर आदी नागरिकांसाठी इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती. यावेळी महिलांची धुरातून मुक्तता व्हावी म्हणून 'समाधान चुली' ही संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये चुलीच्या एका बाजूला सिंमेंट चा पाईप बसवून ता घराच्या वरती काढला होता. यातून धुर घरात न पसरता तो आकाशात सोडला जात होता.
अगदी एखाद्या कारखान्यासारखा, यामुळे लाकडे देखील कमी लागत होती. परंतु काळानुसार आता देशात मोदी सरकार आले, सगळे च बदलून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांना खुश करण्यासाठी उज्वला गँस ही योजना आणली. यामध्ये गोरगरीबांना मोफत गँस वाटप झाले. अनेकांनी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले. पण नवलाई चे नऊ दिवस संपले आणि महागाई ने डोके वर काढले, पेट्रोल, डिझेल व गँस यांचे भयानक दर वाढले आज गँससिलेडर एक हजाराच्या आसपास गेला आहे, डाळीने केव्हांच शंभरी पार केली आहे, तेल व इतर साहित्य ही महागले आहे, भाजीपाला आणि इतर वस्तू चे दरही वाढत आहेत, यामुळे मोफत दिलेला गँस सिंलेडर व शेगडी गृहिणींनी अडगळीत ठेवली आहे, आणि पुन्हा एकदा चुलीवर स्वंयपाक सुरू केला आहे.
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात कौलारू घरातून आणि गोरगरीबांच्या झोपडीमधून धुराचे लोट आकाशात जाताना दिसत होते, संपूर्ण गाव धुरामुळे झाकून गेलेले चित्र सर्वत्र दिसत होते. परंतु हे सर्व काळाच्या ओघात नाहिसे झाले होते. पण पुन्हा एकदा महागाई च्या निमित्ताने का होईना कल्याण तालुक्यातील वरप, कांबा, पावशेपाडा, आपटी रायते, बापसई, गोवेली, पिंपळोली, घोटसई, उशीद फळेगाव, आदी शेकडो गावातून चुलिचा धुर दिसत आहे, सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे वरुन छत भिजलेल्या झोपड्या मधून धुराचे मनमोहक दृश्य गावागावातून पहायला मिळत आहे. फरक इतकाच आहे की पुर्वी समाधान होत, आता मात्र सरकारच्या नावाने शिव्याशाप दिला जातो.



No comments:
Post a Comment