Thursday, 5 August 2021

संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने तिसऱ्यांदा नालासोपारा - विरार येथे रविवारी रेकॉर्ड ब्रेक महा रक्तदान शिबिराचे आयोजन !

संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने तिसऱ्यांदा नालासोपारा - विरार येथे रविवारी रेकॉर्ड ब्रेक महा रक्तदान शिबिराचे आयोजन !


मुंबई, (दीपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :

      "रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान" ही म्हण सत्यात उतरवत पुन्हा तिसऱ्यांदा संतोष अगबुल प्रतिष्ठाणच्या वतीने रविवार दिनांक ८ ऑगष्ट २०२१ रोजी (कंचन विद्यालय, विजय नगर, नालासोपारा- पूर्व) येथे रेकॉर्ड ब्रेक महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. संपूर्ण जगभर गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू महामारी रोगाने थैमान घातलेला आहे. या महामारी च्या काळात अनेक सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाले असतानाच संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा निदर्शनास आले की, अनेक रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. यावर उपाय म्हणून, या देशाचे, राज्याचे सुज्ञ नागरिक या नात्याने थोडासा का होईना हातभार लावावा या हेतूने प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या साथीने दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी सलग तिसऱ्यांदा नालासोपरा नगरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे रक्तदान शिबिर हे अपेक्षेप्रमाणे जास्त प्रमाणात यशस्वी ठरले व गेल्या वेळी रक्त दाता म्हणून दैवत असलेल्या ५२६ रक्तदात्यांनी याठिकाणी येऊन रक्तदान केले होते. "समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे" या ब्रीद वाक्य प्रमाणे गेले दोन वर्षभर हे प्रतिष्ठाण कार्यरत आहे. असे असताना रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर, ठाणे, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी राहणाऱ्या तसेच गावावरून उपचारासाठी मुंबईत आलेल्या रुग्णाला एक रक्ताची बॉटल ही मोफत दिली जात आहे.

               नोव्हेंबर २०२० पासून महिन्याला सरासरी २० रक्त बॉटल या उपलब्ध करून देण्यासाठी या प्रतिष्ठान हे "महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक" व "नवी मुंबई ब्लड बँक" यांच्या साथीने यशस्वी ठरले आहे. 

                पहिल्या रक्तदान शिबीर मध्ये ३७६ आणि दुसऱ्या रक्तदान शिबीर मध्ये तब्बल ५०३ रक्त दात्यांनी रक्तदान केले होते. परंतु प्रतिष्ठानची जबाबदारी वाढल्याने व रुग्णांचा विश्वास वाढत चालल्याने प्रतिष्ठानवरच्या विश्वासाला तडा जाऊ नये व रुग्णांची सेवा सदैव घडत राहो यासाठी पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा नगरीत रक्तदान शिबीर घेण्याचे आयोजन केले आहे. विशेषतः वर्षाचे ३६५ दिवस व दिवसाचे २४ तास" आपण आमच्या प्रतिष्ठानला रक्तासाठी कधीही साद घाला, शंभर प्रतिषद रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रतिष्ठाण कटिबद्ध आहे. महिलांन साठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर राबवून ३२६ महिलांनी सहभाग घेतला व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मोफत वैद्यकीय गोळ्या व औषधे पुरवण्यात आली होती. म्हणूनच संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या सर्व रक्त दाताना विनंती आहे की, रविवार, दिनांक ०८ ऑगष्ट २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपल्या वेळेनुसार आपण वेळ काढावा व अमूल्य असे रक्तदान करून  प्रतिष्ठानला साथ द्यावी. असे आवाहन संतोष अबगुल प्रतिष्ठान सभासद व संस्थापक श्री. संतोष अगबुल यांनी आवाहन केले आहे.

            प्रतिष्ठान च्या वतीने आज पर्यंत केलेल्या सहकार्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबई भागात  तसेच करणाऱ्या रक्तदात्यांच्या ओळखीपैकी कोणालाही रक्त लागल्यास ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेत आहे. दापोली मंडणगड व खेड तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण ठिकाणी १०० उद्योजक व व्यावसायिक उभारण्यासाठी प्रयत्न करीत असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून नेहमीच प्रयत्नशील आहेत. तसेच के.ई.एम. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत टिफिन सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. रुग्णाच्या आजारपणात त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट तसेच इतर सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक ती मदत देण्यासाठी प्रतिष्ठाण २४ तास कार्यरत असते. रत्नागिरी जिल्ह्यातील बांधवांना मंत्रालय स्तरावर किंवा अन्य शासनदरबारी काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत असून तालुका दापोली व खेड, राजापूर, लांजा येथे प्रशासकीय मार्गदर्शन समित्या सज्ज झाले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा नुकसान झालेल्या परंतु नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच प्रतिष्ठानची संलग्न असलेल्या सर्व सदस्यांची भविष्यातील पिढी उत्तम घडावी यासाठी प्रयत्नशील आहे. लॉकडाऊन काळात मुंबई सीएसटी ते पनवेल- बदलापूर व चर्चगेट ते विरार स्टेशन पर्यंत राहणार रत्नागिरी जिल्ह्यातील  गरजूंना अन्न धान्य वाटप करण्याचे कार्य केले आहे. १०० निराधार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे व ३०० निराधार आईबाबांना आधार देत आहेत.

         प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. नितीनजी नटे व प्रेरणास्थान संतोष अगबुल यांनी सर्व रक्तदाताना आवाहन केले असून या शिबिरात जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभाग घ्यावा. अशी विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment