जेष्ठ चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुढाकाराने कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा'आधार'!
कल्याण, (संजय कांबळे) : कोकणातील पुरग्रस्ताना मदतीसाठी हजारोंचे हात पुढे येत असूनही अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचत नाही, हे लक्षात घेऊन मराठी हिंदी चित्रपट नाट्य अभिनेते जयवंत वाडकर यांनी पुढाकार घेतला असून ते राहत असलेल्या बिंदूसारा सोसायटी व इतर मित्रांच्या मदतीने लाखो रुपये चे जीवनावश्यक वस्तू, साहित्य जमा करुन या साहित्याचा ट्रक नुकतात मुंबई हून कोकणाच्या दिशेने रवाना झाला. याचे श्रीफळं वाढवून जयवंत वाडकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मराठी हिंदी चित्रपट जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर हे नेहमीच महाराष्ट्रातील संकटकाळात मदतीसाठी धाऊन येतात, अशी त्यांची ख्याती आहे. मागील वर्षी राज्यात कोरोनाचे भंयकर संकट आले होतें, यावेळी अनेकांचे रोजगार, धंदा, नोकरी गेली होती, यामुळे सर्वावर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी समाजसेवेचा वसा घेतलेले जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर हे पुढे सरसावले. त्यांनी आपल्या, आय ऐ एस, आयपीएस मित्रांच्या मदतीने लाँकडाऊण मुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना जेवण व इतर सोईसुविधा दिल्या होत्या
आता राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर ठाणे,आणि कोकणात भंयकर नुकसान झाले, त्यातल्या त्यात कोकणात दरडी कोसळून, भूसख्खलन होऊन अख्खी गावे उध्दव झाली, यामध्ये जीवीत व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी पुरग्रस्तांंना सढळ हस्ते मदत करण्याचे जनतेला अवाहन केले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मदतीसाठी हात पुढे सरसावले, अगदी विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे, सेलिब्रेटी आदी मदत करत आहेत, पण ही मदत अनेक वाड्या वसत्यांवर पोहचत नाही, रस्त्याचा अभाव, नेटवर्क प्राँब्लेम, आदी कारणांमुळे कदाचित असे होत असावे.
महाड मधील, सवाद, कोडिंवते, राजेवाडी, आकले, बिरवाडी, कुंभारवाडा, ढालकाठी, खरवली, काळीज आदीवासी वाडी, भावे आदिवासी वाडी, मोहिते भिसेवाडी, सुतारवाडी, आसनपोईगाव, बौध्दवाडी, भोरावगाव, भोराव बौध्द वाडी, तसेच पिंपळी, सती, खेर्डी, दळवटने, कळंबसते, गोवळकोट, उकताड, शँकरवाडी, मुरादपूर,भोईवाडा, वडारवाडी आदी चिपळूणतील गावात मदत पोहचणे गरजेचे आहे, या सर्व घटणांचा विचार करून शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी पुढाकार घेऊन लाखोंची मदत जमा केली यातून जिवनावश्यक, वस्तू, अन्न धान्य, कपडे, पाणी, आदींचा ट्रक भरून मदत जमा केली, बिंदूसारा को-आँफरेटिव्ह सोसायटी व इतर मित्रांच्या मदतीने हि मदत कोकणाच्या दिशेने पाठवून दिली याचा शुभारंभ वाडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अजित गोगले, बाळा तावडे, प्रसाद कदम, अमित गुरव, सांंस्कृतिक मंडळाचे सचिन बागवे, ठाकूर, पंकज निकम, आदी मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'आम्ही कायम संकट काळात, किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मुंबई महाराष्ट्राच्या मदतीसाठी धाऊन जातो, हे आमचे कर्तव्य समजतो, याची शासनाने कुठेतरी दखल घ्यावी ऐवढीच अपेक्षा आहे.




No comments:
Post a Comment