Friday, 21 January 2022

आशा कर्मचाऱ्यांचा मागण्या मार्गी लागल्याने कोविड कामावरील बहिष्कार तहकूब .!!. आयटक

आशा कर्मचाऱ्यांचा मागण्या मार्गी लागल्याने कोविड कामावरील बहिष्कार तहकूब .!!. आयटक


चोपडा, बातमीदार.. आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्याने सप्टेंबर 2021 पासून प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही तसेच हरघर दस्तक अंतर्गत आशा कर्मचारी इमानदारीने काम करीत आहेत या कामाचा मोबदला नाही शिवाय थकित मानधन व मागील मांधनवाढीचा फरक देण्यात आलेला नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य खाते कर्मचारी युनियन तर्फे १५ जानेवारीपासून बहिष्कार आंदोलन पुकारण्यात आले होते, आशा वर्कर व ग टप्रवर्तक यांच्या मागण्या मार्गी लागल्याने बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे असे आशा गटप्रवर्तक व आरोग्य खाते कर्मचारी संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

पत्रकात पुढे म्हटले आहे की, या आंदोलनात चोपडा तालुक्यातील व इतर ठिकाणी चे कर्मचारी कोवीड कामावर बहिष्कार टाकून सहभागी होते. चोपडा तालुक्यातील आशां चा सहभाग जास्त होता. चोपडा आरोग्य अभियान कार्यालयाने ज्या सेविका आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे एप्रिल ते 2021 ऑगस्ट 2021 कालावधीमध्ये मानधन वाढ फरक थकबाकी होते त्यांचे खात्यावर मानधन वाढीचां फरक प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे तो चोपडा टीएमओ डॉक्टर लासुरकर यांनी त्या त्या पिएचसी तील आशाचा खाती टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर नोव्हेंबर 2021 महिन्याचे मानधन देखील टाकलेले आहे. सांगून  की, आरोग्य खात्याचे कामी सहकार्य करावे या विनंतीला मान देऊन व बाकीच्या पैशांची देखील तरतूद करतो. या आश्वासनही त्यांनी दिले असून यावर विश्वास ठेऊन तसेच महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कर्मचारी कृती समितीने दिलेल्या निवेदनावर देखील माननीय आरोग्य मंत्री यांनी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. त्यातून मागण्या मार्गी लागतील अशी आशा आहे. म्हणून आशा कर्मचाऱ्यांचे कोवीड कामावरील बहिष्कार आंदोलन तहकूब करण्यात आले आहे, अशी माहिती आशा गटप्रवर्तक व आरोग्य खाते कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांनी जाहीर केलेल्या पत्रकात दिली आहे. 

ज्या आशा व गटप्रवर्तक यांनी  आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे दबाव वाढला व त्यातून आशा व गटप्रवर्तक मागण्या मंजूर झाल्या मार्गी लागल्या या आंदोलनात ज्यांनी  सहकार्य व सहभागा दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद ही पत्रकात देणेत आला आहे!!🙏🙏

No comments:

Post a Comment