Friday, 21 January 2022

एमआयडीसी च्या वरीष्ठ आधिका-यांकडून आपटी बंधारा रस्त्याची पाहणी, ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार !!

एमआयडीसी च्या वरीष्ठ आधिका-यांकडून आपटी बंधारा रस्त्याची पाहणी, ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार !!


कल्याण, (संजय कांबळे) : पत्रकारांनी उठवलेला आवाज आणि लोकप्रतिनिधी नी केलेला सातत्याने पाठपुरावा यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जीवघेणा प्रवास ठरलेला रस्ता अखेरीस दुरुस्त होणार असून याची आज अंबरनाथ एमआयडीसी च्या वरीष्ठ आधिका-यांनी लोकप्रतिनिधी व पत्रकार संजय कांबळे यांच्या सह पाहणी दौरा केला व येत्या काही दिवसांत ग्रामस्थांची ही गैरसोय दूर होईल असे आश्वासन दिलं. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.


कल्याण तालुक्यातील आपटी आणि वसत या गावातील व आजूबाजूच्या नागरिकांना उल्हास नदीवरील या बंधाऱ्याच्या खालील रस्त्यावरुन कसा जीवघेणा प्रवास करावा लागतो हे प्रथम पत्रकार संजय कांबळे यांनी जगासमोर आणले, यानंतर या भागाच्या झेडपी सदस्य जयश्री सासे यांनी कार्यकर्ते सह या भागाची पाहणी केली, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गेल्याने प्रथम गुफ्तचर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा बोराडे, वपोनी विनायक गोले, पिएस आय साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बंधाऱ्याला भेट दिली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले, परंतु अद्यापही कल्याण तहसीलदार व एमआयडीसी चे आधिकार यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पुन्हा 'पाणी प्रश्न पेटणार, तहसीलदारांचे दुर्लक्ष' अश्या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच आज सकाळी अंबरनाथ एमआयडीसी चे कार्यकारी अभिंयता एस पी आव्हाड, उप अभियंता एम एस जाधव,सहाय्यक अभिंयताडि व्ही राऊत, झेडपी सदस्या जयश्री सासे, वसत ग्रामपंचायतीचे सरपंच मधूकर राणे, उपसरपंच हरिश्चंद्र गोंडाबे, नदू शिसवे, विनोद शिसवे, नवनवीन कराले, नवनवीन राणे, वंसत शिसवे, सुरेश शिसवे, रामचंद्र म्हसकर, आणि पत्रकार संजय कांबळे यांनी बंधाऱ्याच्या रस्त्याची पाहणी केली.


यावेळी सरपंच मधू राणे यांनी आम्हाला कायमस्वरूपी पूल बांधून द्यावा अशी आग्रही मागणी केली. तेव्हा आमचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे, आम्ही रस्त्याची दुरुस्ती चे काम तातडीने हाती घेतो, पुला संदर्भात आपण शासनाकडे मागणी करावी अशी विंनती केली.


दरम्यान एमआयडीसी च्या आधिका-यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान हा रस्ता खरेच जीवघेणा असल्याचे त्यांनी मान्य केले. व याबाबत आपण आवश्यक ते सहकार्य करु असे आश्वासन दिले. तर यानंतर कल्याण तहसीलदार जयराम देशमुख यांनी ही या भागाची पाहणी केली. व परिस्थिती जाणून घेतली,

तथापि जोपर्यंत आमच्या ग्रामस्थांचा हा कायमस्वरूपी प्रश्न सुटत नाही, आम्हाला सुरक्षित पर्यायी रस्ता मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील असे वसत ग्रामपंचायतीचे सरपंच मधू राणे यांनी सांगितले तर याबाबत आपण लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पुलाच्या विषयी मागणी करणार आहे असे जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री सासे यांनी सांगितले.


.

 

 

No comments:

Post a Comment