Sunday, 20 February 2022

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गोरेगावची कन्या श्रावणी सुनिल गोरेगावकर पुन्हा एकदा प्रथम !!

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गोरेगावची कन्या श्रावणी सुनिल गोरेगावकर पुन्हा एकदा प्रथम !!


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान  शाळा फाउंडेशन बार्शी सोलापूर आयोजित  online वक्तृत्व स्पर्धेत गोरेगावची कन्या श्रावणी सुनिल गोरेगावकर हिने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला. गेल्यावर्षी झालेल्या कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता या स्पर्धेत 5 वी ते 8 वीच्या गटात श्रावणीचा प्रथम क्रमांक होता. हीच यशाची परंपरा कायम ठेवत तिने यावर्षी 6 वी ते 10 वीच्या गटात माझे आदर्श छत्रपती शिवराय या विषयावर भाषण केले. अभ्यासपूर्वक विषय हाताळणी, खणखणीत आवाज, बोलण्यातील लकब, आत्मविश्वास, अचूक पाठांतर, चेहऱ्यावरील हावभाव, आणि तिने घेतलेली मेहनत यामुळेच तिने यश संपादन केले. 

श्रावणी सध्या ना म जोशी विद्याभवन गोरेगाव येथे इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकत आहे. मागील दोन वर्षे शाळा बंद होत्या त्या काळात विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने शाळा फाउंडेशनचे संस्थापक श्री. प्रतापसिंह मोहिते यांनी राज्यास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
श्रावणी सलग दोन वर्ष प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तिला आयोजकां कडून रु 2000 व प्रमाणपत्र मिळणार आहे. 

श्रावणीच्या या स्पर्धेत YouTube वरील views ना 40 % गुण होते व 60% गुण हे परिक्षकांच्या हाती होते. श्रावणीचे आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त जणांनी विडिओ पाहिला आहे. यात सुनिल गोरेगावकर यांच्या कुटुंबातील सदस्य ,मित्रपरिवार, शिक्षक, नातेवाईक अनेक राजकीय नेते मंडळी, पत्रकार या सर्वांनी श्रावणीचा video पाहून सर्वांना share केला. सर्वांनी खुप मोलाचे सहकार्य केले आहे.  त्यामुळे त्या सर्वांना श्रावणी व तिच्या कुटुंबाकडून मनापासून धन्यवाद.

No comments:

Post a Comment