रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पोवाडे स्पर्धेत कोकणचा सुपुत्र बाल शाहीर वेदांत दिपक मांडवकर ठरला उपविजेता !!
"माय बाप राशिक प्रेक्षकांचे बाल शाहीर वेदांत दिपक मांडवकर यांनी मानले आभार"
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा असे ब्रीद वाक्ये घेऊन काम करणाऱ्या नोंदणीकृत रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे रायगड येथे शिवजयंती निमित्त ऑनलाईन पोवाडे स्पर्धेचे आयोजन दिनांक १३ ते १४ फेब्रुवारी रोजी केले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये कोकणचे सुपुत्र पश्चिम उप नगरातील नालासोपारा येथील रहिवाशी पत्रकार दिपक मांडवकर यांचा पुत्र कु. वेदांत दिपक मांडवकर (वय -१४ ते २१ या गटात) उप विजेता म्हणून दुसरा क्रमांक मिळाला.
आयोजक रायगड मी मराठी प्रतिष्ठाण व राजेश नारकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत मांडवकर कुटुंब यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. जितेंद्र शिंदे यांनी या व्हिडीओची लिंक बनून दिली. त्यांचेही आभार मानले आहेत.वेदांत याच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून मांडवकर कुटुंब त्याच्या सोबत आहे. रशिक प्रेक्षक आणि त्याचा संपूर्ण परिवार यांनी साथ दिल्यामुळे हे पारितोषिक प्राप्त झाले.त्या बद्दल सर्व प्रथम या सर्वांसाठी मांडवकर कुटुंब नतमस्तक आहे. असेच प्रत्येक वेळी आपण खंबीर पणे या बाल शाहिराच्या पाठी उभे रहाल अशी आम्ही मांडवकर कुटुंब आशा बाळगतो असे मत दीपक तुकाराम मांडवकर यांनी व्यक्त केले. कोकणचा सुपुत्र बाल शाहीर वेदांत दिपक मांडवकर उपविजेता ठरल्याबद्दल कोकणासह मुंबई आणि उपनगर परिसरातील नागरिक, समाज मंडळ, संस्था आणि समाज बांधव यांच्याकडून वेदांत याला अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


No comments:
Post a Comment