Monday, 7 February 2022

मुख्याध्यापक महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव भोसले, उपाध्यक्षपदी बाबासाहेब पांढरे !!

मुख्याध्यापक महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव भोसले, उपाध्यक्षपदी बाबासाहेब पांढरे !!


जत, बातमीदार:- महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या जत तालुकाध्यक्षपदी नामदेव भोसले यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पांढरे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष संभाजी पाटील यांनी जत येथील मुख्याध्यापक मेळाव्यात या निवडी जाहीर केल्या व नूतन पदाधिकारींचा सत्कार केला. 


जत येथील प्राथमिक शाळा क्रमांक 2 च्या सभागृहात प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांचा तालुका मेळावा पार पडला. यावेळी संघटनेची तालुक्यातील अन्य कार्यकारणीही जाहीर करण्यात आली. यानुसार कार्याध्यक्षपदी राजाराम हरिबा यादव व सरचिटणीसपदी तुकाराम शिवाप्पा कोकरे यांची निवड झाली. कोषाध्यक्ष- रामचंद्र उमला राठोड ,सहचिटणीस- विलास हरिबा देवकुळे, प्रसिद्धी  प्रमुख -सिदगोंडा मल्लाप्पा पाटील, सौ. सुनीता कांतीलाल वसावे, संपर्कप्रमुख- रावसाहेब कृष्णा वाघमोडे, सुभाष मार्तंड टेकाळे, महादेव राचगोंडा पुजारी, जयश्री देवाप्पा सुर्वे, संघटक- अशोक ज्ञानोबा सूर्यवंशी ,प्रभू सावजी खूपसे, राजेंद्र विष्णू कोळी, जयश्री शंकर कुपसद, कार्यकारी सदस्य- अशोक मारुती चव्हाण, मनोज रामराव खोकले, चिदानंद रामचंद्र सुतार,मंदाकिनी सुरेश सोनवणे तसेच तालुका नेतेपदी अण्णाराव रुद्राप्पा पाटील, भिमू ज्योत्याप्पा पुजारी, विठ्ठल बसगोंडा बसर्गी, अण्णासाहेब भीमान्ना कबाडगे, यशवंतराया नागापगौडा बिरादार यांची निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment