Sunday, 20 February 2022

शिवजयंती निमित्ताने माता रमाबाई, माता जिजाबाई, माता भिमाई व सावित्रीबाई यांची संयुक्त जयंती साजरी !

शिवजयंती निमित्ताने माता रमाबाई, माता जिजाबाई, माता भिमाई व सावित्रीबाई यांची संयुक्त जयंती साजरी !


  मुंबई- (शांताराम गुडेकर/प्रियांका सवाखंडे) :
              शिवजयंती निमित्ताने माता रमाबाई, माता जिजाबाई व सावित्रीबाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम सिद्धार्थ सांस्कृतिक संघ व महिला मंडळ तर्फे जेतवन बुद्धविहार, तांबेनगर मुलुंड (पश्चिम) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना निर्भवणे व संगीता गवळे यानी पार पाडले. 


छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्या गाण्यांवर लहान मुलांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात महिलांनी सक्षम महिलांची भूमिका करून ती कितीही सक्षम असली तरी सुरक्षित नाही व त्यासाठी निर्भया पथक कसे उपयुक्त आहे हे एका छोट्या नाटिकेतून सादर केले. या कार्यक्रमास मुलुंड विभागाच्या पी.एस.आय पूनम पवार आणि पूजा पवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 


पी.एस.आय पूनम पवार यांनी निर्भया पथकाची स्थापना, त्याचा वापर तसेच ते पथक कसे कार्यरत आहे याची माहिती दिली. पालकांनी मुलांचे संगोपन करताना कोणत्या दक्षता पाळाव्यात याबाबत माहिती दिली. माजी नगरसेविका मिनाक्षीताई पाटील यांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांना शुभेछा दिल्या. सिद्धार्थ सांस्कृतिक संघाच्या सचिव स्मिता कवडे यांनी उत्तम प्रकारे महिलांकडून तयारी करून घेतली. संघाचे अध्यक्ष आहिरे, शेखर हिरे, विजय जाधव, रवी भालेराव तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिता केदारे, शालिनी रोकडे व इतर सर्व महिलांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment