Monday, 21 February 2022

पालक-विद्यार्थी सामाजिक संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !! *प्रबोधनपर शाहिरी जलसा व व्याख्यानाचे आयोजन*

पालक-विद्यार्थी सामाजिक संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !!

*प्रबोधनपर शाहिरी जलसा व व्याख्यानाचे आयोजन*


मोहने, संदीप शेंडगे : पालक विद्यार्थी सामाजिक संघटनेतर्फे मोहने येथील आर एस गेट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्त्व जाणून बहुजन राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून पालक विद्यार्थी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. 


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तू भेट देऊन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन व्हावे तसेच छत्रपतींच्या इतिहासाची ओळख व्हावी म्हणून समाजामध्ये छत्रपतींचे कार्य तळागाळात बहुजन पर्यंत पोहोचविणे याकरिता पालक विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेतला. या वर्षी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शाहिरी जलसा व प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करून मोठ्या शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या जयंतीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या केंद्रीय शिक्षिका अविंदा वाघमारे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुंदर असे प्रबोधनपर व्याख्यान सादर करण्यात आले. धम्मपाल आरवेल, स्वप्नील शिरसाट या दोन तरुण तडफदार शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शाहिरी जलसा सादर करून महाराजांना मानवंदना दिली. 


या कार्यक्रमासाठी शिवसेना उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड यांनी उपस्थित होते. जोगदंड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय समिंदर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा मोहोने शहर अध्यक्ष दिनेश जाधव, पालक विद्यार्थी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिन बोराडे सचिव आनंद सोनवणे, खजिनदार चंद्रकांत पाटील, सहसचिव बाळू गायकवाड सहसचिव संगपाल कांबळे सल्लागार अनिल लबडे उपाध्यक्षा जस्मिन पाटील यांसह विकास राजगुरू, नितीन राजगुरू, श्रीकांत घोडेराव, राजू गायकवाड, संजय राजगुरु आधी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


उपस्थित विद्यार्थी व पालकांना मिठाई वाटून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन राजेश मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment