Monday, 7 February 2022

"संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान" आणि "चर्मकार विकास संघाच्या" वतीने अण्णा पंडीत यांचा सत्कार. !!

"संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान" आणि "चर्मकार विकास संघाच्या" वतीने अण्णा पंडीत यांचा सत्कार. !!


कल्याण, (सागर शिंदे) : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत या संघटनेच्या " राष्ट्रीय निरीक्षक " पदी नियुक्ती झाल्याबद्दल "चर्मकार विकास संघ आणि संत रविदास समाजिक प्रतिष्ठान" या संघटनेचे कल्याण-उल्हासनगर तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष गजानन लिंबोरे, उल्हासनगर शहर सचिव भिकन जाधव, उपाध्यक्ष पितांबर शिंदे, प्रवक्ते पंकज डोईफोडे, बापुसाहेब वाघमारे आदिंनी कल्याण "परीमंडळ-३ कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. उमेश माने-पाटील साहेबां"च्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 


या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे, तालुका सचिव कांचन धारगावे सतिश गवई इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णा पंडीत यांच्या राष्ट्रीय निरीक्षक पदी झालेल्या नियुक्तीने समाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असुन समाजातील विविध स्तरातुन व अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





No comments:

Post a Comment