Monday, 21 February 2022

शिवशंभु मराठा प्रतिष्ठान म्हारळ तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजन्मोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा !!

शिवशंभु मराठा प्रतिष्ठान म्हारळ तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजन्मोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा !! 


कल्याण, (संजय कांबळे) : शिवशंभू मराठा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला गेला. प्रतिष्ठानचे हे ६ वे वर्ष असून शिवजयंतीच्या शिवभक्तांनी संपूर्ण म्हारळ गाव भगवेमय झाले होते.


दिवसभर शिवभक्ताची रेल-चेल गावदेवी मंदिर येथील पटांगणात चालूच होती. प्रतिष्ठानने 'मोफत महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर' याचे आयोजन केले होते. त्याला परिसरातील शेकडो लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामध्ये मोफत औषधांचे देखील वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केलं .


प्रतिष्ठान गेले पाच वर्षापासून अनेक समाज कार्य करतच आहे. त्यातच त्यांनी हाती घेतलेले स्वतंत्र पोलीस स्टेशन आणि शिवभित्तिचित्र याचा पाठपुरावा जोरदार चालूच आहे, त्यातून शिवजन्मोत्सव साजरा जोरातच करायचं असं प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंच होतं. कोरोना महामारीच्या काळात गेली २ वर्ष शिवजन्मोत्सव हा तेवढा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करता न आल्यामुळे यावर्षीच्या शिवजयंतीला सगळ्यांचाच उत्साह खूप वाढला होता आणि त्याला प्रतिसाद ही चांगला मिळाला शिवजयंतीसाठी जो भव्य आणि दिव्य देखावा त्यात चलचित्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच विद्युतरोषणाईने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वांच्या उत्साहाला आनंद मिळत होता खूप सारे शिवभक्त तर फोटो आणि सेल्फी मध्ये मग्न झाले होते त्याच प्रमाणे सर्वांनी प्रतिष्ठानच्या आयोजनावर देखील शब्द सुमनांनी वर्षाव केला होता. प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यात आणि त्यांनी केलेल्या कार्यावर सर्वांचा विश्वास आहे म्हणूनच शिवजन्मोत्सव २०२२ एवढ्या थाटामाटात, जल्लोषात आणि उत्साहात साजरा झालाअसे त्यांचे म्हणणे होते..  


प्रतिष्ठानच्या शिवज्योत यात्रेत शिवनेरी वरून शिवज्योत आणण्यासाठी प्रतिष्ठानची रणरागिनी अश्विनी पाटील ही गावातील पहिली महिला जी ने शिवनेरी वरून शिवज्योत आणली हेच या जंयतीचे मुख्य आकर्षण होते. त्यामुळे शिवज्योत आणलेल्या प्रत्येक शिवभक्ताला प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले मिरवणुकीसाठी  लहान मुलांचे 'लेझीम पथक' तयार केले होते त्यासाठी मुलांनी देखील पंधरा ते वीस दिवस दररोज दोन ते तीन तास सराव करून खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला व तेच शिव मिरवणुकीचे लक्ष वेधून घेणारे केंद्रबिंदू ठरले त्यांचा देखील प्रतिष्ठानने प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.  अभिमानाची गोष्ट म्हणजे शिव मिरवणुकीसाठी पालखी तयार करण्यात आली होती ती शिवकन्या यांनी उचलली होती तसेच गावातील महिलांना देखील पालखी घेण्याचा मान दिल्यामुळे त्यांना त्याचा अभिमान वाटला व महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या तसेच मिरवणुकीतील खास वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ मधील प्रसिद्ध मावळ ढोल पथक पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात लेझीम च्या तालात घोषणेच्या सुरत आणि फटाक्यांच्या अतिशबाजीत संस्कृतीचे पालन करून महाराजांचा आदर्श अठरा पगड जाती ला एकत्र घेऊन महाराजांची पालखी थाटामाटात निघाली होती संपूर्ण गाव शिवमय झाला होता.

शिव गीतांच्या कार्यक्रमासाठी कर्जत चे गायक 'जगदीश धुळे' यांनीदेखील त्यांच्या सुरेल आवाजाने शिवभक्तांना मंत्रमुग्ध करून शिवजयंतीचा खरा आनंद दिला. सामाजिक बांधिलकी जपत, प्रतिष्ठानने सांस्कृतिक, कला प्रबोधन ,समाजहित डोळ्यासमोर ठेवून हा आगळा वेगळा शिवसोहळा आयोजित केल्याने संपूर्ण परिसरातून शिवशंभू मराठा प्रतिष्ठान चे कौतुक होत होते.

No comments:

Post a Comment