डोंबिवली, संदीप शेंडगे : ठाणे भारत स्काऊटस आणि गाईडस ठाणे संलग्न डोंबिवली भारत स्काऊटस आणि गाईडस स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष कैलास म्हात्रे, सचिव मोहनदास कामत जिल्हा संघटक संगीता रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्याध्यक्ष आणि महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुर आहेर, डोंबिवली भारत स्काऊट गाईडचे अध्यक्ष अशोक जगताप, सचिव जगदीश उगले यांच्या प्रयत्नाने, २२ फेब्रुवारी मंगळवारी ग्रेस इंग्लिश विद्यालय मिलाप नगर डोंबिवली पूर्व येथे भारत स्काऊट गाईड चिंतन दिन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. भारत स्काऊट अँड गाईडस चे बेडन पॉवेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिंतन दिनाचे औचित्य साधून डोंबिवली स्काऊट गाईडस संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवक, डॉक्टर, शिक्षक यांना आदर्श कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये आर एस पी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी, संजीवनी हॉस्पिटल कल्याणचे डॉ. अरुण पाटील रामनगर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अशोक खैरनार, वैशाली जाधव, आदर्श सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले लेकराज वाल्मिकी, या मान्यवरांचा कोरोणा योद्धा म्हणून गौरव करण्यात येणार आहे. कै. सुरेंद्र बाजपेयी यांचा स्मरणार्थ आदर्श स्काऊट मास्टर म्हणून गोपाळ हनुमंत सर्वेकर (चंद्रकांत पाटकर विद्यालय), प्रा.एकनाथ चौधरी (जनगण मन विद्यामंदिर,) दिलीप तडवी (कॅप्टन ओक हायस्कूल कल्याण) यांना जाहीर देण्यात येणार आहेत. तसेच बी एस मंत्री यांचे स्मरणार्थ आदर्श गाईड कॅप्टन म्हणून शैलजा सुनील धमाळ, (शिवाय बालक मंदिर) माधुरी प्रधान मुख्यापिका ग्रीन इंग्लिश स्कूल, यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापिका ग्रिन्स इंग्लिश स्कूल माधुरी प्रधान, डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचे खजिनदार राजू घुले स्काऊट गाईड संस्थेचे सदस्य उदय नाईक, प्रा. लक्ष्मण इंगळे, एकनाथ चौधरी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी सदर कार्यक्रमाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

No comments:
Post a Comment