Tuesday, 19 April 2022

कोकणातील खेळाडूंचे क्रिकेट साठी मोठे योगदान - श्री. ऋषिनाथ दादा पत्याणे

कोकणातील खेळाडूंचे क्रिकेट साठी मोठे योगदान - श्री. ऋषिनाथ दादा पत्याणे


कोकण, (शांताराम गुडेकर) :
       स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री. ऋषिनाथ दादा पत्याणे यांचे छोटे बंधू आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. प्रमिल पत्याणे यांच्या संकल्पनेतून क्रीडा विभागामध्ये अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात येते. 


गेली काही वर्ष संस्थापक साहेबांच्या गावी वाघ्रट येथे कै. दाजी पत्याणे स्मृती चषक अंडरआर्म भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा होतात. या वर्षीही  संस्थापक श्री ऋषिनाथ दादा पत्याणे आणि राष्ट्रवादीचे युवा प्रदेश सरचिटणीस आणि तरुण नेतृत्व चेतन दळवी, पूनसचे विद्यमान सरपंच इलीयाज बंद्री यांच्या उपस्थितीमध्ये कै. दाजी पत्याणे स्मृती चषक अंडरआर्म भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा-2022 संपन्न झाल्या. 



यावेळी आलेल्या क्रीडारसिकांनी आणि खेळाडूंनी प्रमिल पत्याणे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि गावासारख्या ठिकाणी एवढी छान खेळपट्टी आणि क्रीडांगण उभ केल्याबद्दल प्रमिल पत्याणेंच अभिनंदन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रमिल पत्याणे म्हणाले की संस्थापक आदरणीय श्री. ऋषिनाथ दादांचा हा जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणूनचं मुंबई सारख्या मोठ्या शहरातून कार्गो युनिटच्या काही दर्जेदार टीम गावी नेवून त्यांच्या सुंदर खेळाच प्रदर्शन होत असल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना बरचस काही त्यातून शिकता येत आहे. 


यावेळी एनआरपी (NRP) ग्रुप मुंबईचे अध्यक्ष नितीश पत्याणे, विनोद सावंत, प्रवीण मेस्त्री, समीर सावंतदेसाई, सचिन पत्याणे, प्रशांत इंदुलकर, महेंद्र शेलार, विजय साळुंखे, सुनिल पत्याणे, अरविंद पत्याणे, शशिकांत गुरव, रमेश घवाळी, निशांत पत्याणे, दत्ताराम पत्याणे, आतिश पत्याणे, अभिजित बनकर, संतोष पत्याणे, वसंत घवाळी, संतोष रेवाळे, संतोष गोताड, श्रीकांत मेस्त्री, विनोद शिंदे, संदीप कटम, सूर्यकांत बने, सुहास चव्हाण आणि प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक एस.एफ स्पोर्ट्स -बी (S.F. SPORTS B) चांदोर, द्वितीय पारितोषिक एस.एफ स्पोर्ट्स -ए (S.F. SPORTS-  A) चांदोर व तृतीय पारितोषिक स्वयंभू निरुळ यांनी पटकावले. सर्व खेळाडू यांचे व आयोजक यांचे क्रिकेट रशिकांनी कौतुक करत आभार व्यक्त केले. तर अनेकांनी विजेते संघ यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment