Wednesday, 20 April 2022

शिवसेनेच्यावतीने नालासोपारा शहरात मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न ! "श्री.पंकज देशमुख (शिवसेना युवा नेतृत्व) यांचे मोलाचे सहकार्य"

शिवसेनेच्यावतीने नालासोपारा शहरात मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न !

"श्री.पंकज देशमुख (शिवसेना युवा नेतृत्व) यांचे मोलाचे सहकार्य"


नालासोपारा, (शांताराम गुडेकर / दिपक मांडवकर) :

             वसई अंध दुःख निवारक मंडळ डोळ्यांचे हॉस्पिटल, पारनाका, वसईचा राजा गणेशोत्सव मंडळ, महादेव आटोरिक्षा संघटना, वीरमाता जिजाईनगर रहिवाशी विकास संघटना, कोल्हापूर रहिवाशी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. मेघना कुलकर्णी (ट्रस्ट व्यवस्थापक वसई अंध रिलीफ असोसिएशन) व श्री. पंकज देशमुख (शिवसेना युवा नेतृत्व) यांच्या सौजन्याने मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शिवसेना वीरमाता जिजाई नगर शाखा क्र-१ प्रभाग क्र.१६, नालासोपारा (पूर्व) येथे पार पडले. 


या स्तुत्य लोकोपयोगी शिबीरात ६० ते ७० नागरिकांनी तज्ञ डॉक्टरां कडून डोळे तपासणी करून घेतली. व आवश्यकतेनूसार २६ नागरिकांवर मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना दरम्यानच्या काळात मोफत चहा, नाष्टा, भोजन व औषध उपचाराची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर सहा पेशंटना मधुमेह, अतिरक्तदाब या कारणामुळे शस्त्रक्रिया नंतर करण्यात येईल असे सांगून दहा जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, श्री तुकाराम म्हस्के, श्री महादेव जाधव, श्री सहदेव शिरकर, श्री. दिनेश चव्हाण, श्री. राजाराम सूर्याजी, श्री. जगन्नाथ कामतेकर, श्री. बाबुराव खरात, सौ. लक्षमी गुरव, सौ. लक्षमि कदम, श्रीमती विमल शिबे यांची शस्त्रक्रिया करून दोन दिवस निगराणीखाली ठेऊन त्यानां काळा चष्मा देऊन संस्थेने स्वतः तीन दिवसांनी घरी आणले. विभागातील उर्वरित पेशंटसाठी परत व्यवस्था करण्यात येईल असे कळवण्यात आले. स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख के.के.भालेकर यांनी सर्वांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment