ग्राहकांनी वीज बिल थकविल्यास वीजपुरवठा खंडित होणार ; कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे
रत्नागिरी, बातमीदार : ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वीज बिलांच्या वसुलीसाठीही कसरत करावी लागते, ही बाब चिंतनीय आहे. महावितरणला ग्राहकांना सेवा देण्यासाठी वीज खरेदी करावी लागते.दैनंदिन कार्यचक्र व वीज खरेदीच्या खर्च भागविण्यासाठी पैसा लागतो. वीज सेवा वापरणे मात्र त्याचे मोल वेळेत अदा करण्यास टाळाटाळ करणे ही प्रवृत्ती बळावते आहे. त्यात महावितरणची आर्थिक कोंडी होते. तेव्हा ग्राहकांनी वीज बिल थकविल्यास विजपुरवठा खंडित करा, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत, अशी माहिती महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी सिंधुदुर्ग येथे महावितरणच्या उपविभागस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता विनोद विपर, बाळासाहेब मोहिते यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते.

No comments:
Post a Comment