Thursday, 23 June 2022

७० वर्षांच्या डोंबिवली येथील पदमावती काशीद मावशी करतात मुरबाडकरांची सकाळ सुगंधीत.. !

७० वर्षांच्या डोंबिवली येथील पदमावती काशीद  मावशी करतात मुरबाडकरांची सकाळ सुगंधीत.. !


मुरबाड, (मंगल डोंगरे) : डोंबिवली येथील ७९ वर्षाच्या पदमावती मावशी यांच्या अगरबत्तीचा सुगंध आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दरवळताना दिसून येत असुन, मुरबाड तालुक्यातही त्यांच्या अगरबत्तीचा वास पसरला आहे. 


आपला पती वारल्या नंतरही गेल्या २२ वर्ष सुगंधीत अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या डोंबिवली येथील ७० वर्षांच्या पदमावती काशीद या मावशी मुरबाड येथे आजही तरुणांना लाजवेल अशा रितीने सुगंधीत अगरबत्तीचा व्यवसाय करीत आहेत. 

लोकांचे जीवनमान सुगंधीत करण्याचा विडा उचललेल्या पदमावती काशीद या मावशी एक झोला घेऊन डोंबिवली येथून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, वाडा,पनवेल अशा तालुक्यातील सरकारी कार्यालये, शाळा व येथील लोकांना सुगंधीत अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय नित्यनेमाने करीत आहेत.

आपले पती पांडुरंग काशीद यांच्या सोबत पद्मावती मावशी अगरबत्तीचा व्यवसाय करीत होत्या. या मावशी कडून एकदा घेतलेली अगरबत्ती पुन्हा याच मावशीला फोन करून घेण्यासाठी लोकांची झुबंड उडायची माफक दरात पण दर्जेदार सुगंधीत अगरबत्ती मुळे लोकांची मागणी वाढत आहे.

गेल्या वर्षी पदमावती मावशीच्या पतीचे निधन झाल्या  नंतरही मावशी खचली नाही पुन्हा नव्या उमेदीने लोकांचे जीवन सुगंधीत करणारा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केल्याने पद्मावती मावशीच्या कष्टाला जिद्दीला सलाम केला जात आहे. 

एका हॉटेल मध्ये मावशीची लगबग दिसली आणि ७० वर्षां मध्ये ही मावशीची तळमळ अगरबत्ती विकतानाची स्टाईल व त्यांचे लाघवी बोलणे, आणि अगरबत्ती विकतानाही  प्रेमळ, ओजस्वी स्वभाव लोकांना भावून गेला.या वेळी अनेक लोकांनी नेहमी घेत असलेल्या अगरबत्तीला तिलांजली देऊन मावशी कडून सुगंधीत खात्रीपूर्वक अगरबत्ती खरेदी करण्याचा मोह अनेक लोकांना आवरता आला नाही.या प्रसंगी न्यू इंग्लीश स्कूलचे अशोक रोकडे व सामाजिक कार्यकर्ते विजय घायवट यांनी सांगितले की गेल्या कित्येक वर्षे आम्ही या मावशी कडून अगरबत्ती विकत घेतोय या अगरबत्या सुगंधीत व दर्जेदार असतात.

No comments:

Post a Comment