Wednesday, 24 August 2022

आरएसएस, भाजपच्या सत्तेची वैशिष्टय़े.... *सर्वांना डंख मारून त्यांना संपवण्याची भाषा करणारा पक्ष शेवटी सर्वांच्या डंखानेच संपणार*

आरएसएस, भाजपच्या सत्तेची वैशिष्टय़े....

*सर्वांना डंख मारून त्यांना संपवण्याची भाषा करणारा पक्ष शेवटी सर्वांच्या डंखानेच संपणार*

                                ( अमृत महाजन )

आरएसएस, भाजप जोड गोळीने खोटा इतिहास, खोटे देशप्रेम राष्ट्रवाद काळा पैसा आणणार महागाई भ्रष्टाचार घालवणार महागाई कमी करणार असे तद्दन... खोटी फेक वायदे करून काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी देशभक्त लोकांवर बदनामीची मोहीम चालवून भारताची सत्ता हडपली, आठ वर्षे झाली, आता देशात त्या सत्तेविरूद्ध आवाज उठत आहेत वादे वायदे आश्वासन खोटी होती, मूठभर कॉर्पोरेट घराणी विरुध्द सत्ता वापरली जात आहे, जनता भरडली जात आहे हे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे, त्याबरोबर पर्यायही दिसू लागले आहेत म्हणून यामुळे चवताळलेल्या मोदी सरकारने साम, दाम हे दोन वापरून विरोधी नेतृत्वाला गारद करण्याचा विडा उचलला आहे .....केजरीवाल यांचा उदय.... बिहार.. तेजस्वी यादव, जनता दल (यु.) ची सत्ता.. महाराष्ट्रातही महाआघाडीचा प्रयोग, कर्नाटकातील खद खद... शेतकरी आंदोलनची ललकारी... कुठे तरी आरएसएस, भाजप सत्तेला चॅलेंज भेटू लागले आहे. त्यातच मोदी सरकारचे हिंदू मुस्लिम वादाचे हत्यार बोथट होऊ लागले आहे आणि तसतसे आरएसएस, भाजप गोटात अस्वस्थता पसरत आहे.. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांना हटवून शिंदे सरकार आले आहे.. पण जन मान्यता मिळालेली नाही. उद्धव ठाकरे यांचे बद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे गुजरात मध्ये मत्रिमंडल बदल ऐन निवडणूक जवळ आल्याचे काळात करावा लागला आहे.. पाकिस्तान अंतर्गत वादाने त्रस्त आहे.म्हणून त्यांच्या कुरापती शांत दिसतात. ३७० कलम रद्द करूनही काश्मिरात काही हाती लागत नाही, आसाम व ईशान्य भारतातील भाजपची सत्ता ऑक्सिजन वर आली आहे. कराराचा भंग करणाऱ्या चीनशी मोदी सरकार नरमाईने वागत आहे.. अशा सर्व प्रकरणी पिसाळलेले आरएसएस, भाजप सत्ताधारी मंडळी, केजरीवाल, तेजस्वी यादव, नितीशकुमार सरकार यांचे विषयी कुरापत्या काढायला सुरुवात केली.. नेहमीच विरोधी बकवास करत या सरकारने सात वर्षे घालवली पण राजनाथसिंह यांनी वाहवा केली आहे, अधून काढून वरूण गांधी मेघालय राज्यपाल, गडकरी घरचा आहेर देतच असतात म्हणून मोदी सरकार विरोधकांवर.. ईडी, सीबीआय यंत्रणांचा सऱ्हाश दुरुपयोग करीत आहे ज्या इंदिरा गांधी वर हुकूमशाह असल्याचा आरोप भाजप व त्याचे पूर्वसूरी करत ते इंदिराजीं पेक्षा पुढे जात आहेत इंदिराजींनी निदान तरी बँक राष्ट्रीय करण.. केले श्रीमंतांच्या वर ७४ टक्के कर केले... भूमिहीनांना जमिनी बेघरांना घरे दिली. कर्ज माफी केली सावकारी बंद केली, राजे महाराजांचे तनखे पगार बंद केले... गहू, तांदूळ, तेल, तूप, रवा, मैदा, कपडे, रेशन मधून दिले.. पण नेमके मोदी सर्व उलट करीत आहे २०२४ ला सत्ता ताब्यात राहावी म्हणून कट कारस्थान षडयंत्र रचीत आहे विरोधकांना जंग जंग पछाडत आहे ..संबित पात्रा, किरीट सोमय्या व मीडियातील प्रवक्ते यांचा तद्दन भुंकण्यासाठी वापर करून घेत आहे.. पण यामुळे भाजप पुन्हा फक्त दोन खासदार सीट देशात मोदींचे नेतृत्वात निवडून आणणार असे दिसत आहे.. सर्वांना डंख मारून त्यांना संपवण्याची भाषा करणारा पक्ष शेवटी सर्वांच्या डंखानेच संपणार...
उदा. "हिटलर व मुसोलिनी"   
लेखन - अमृत महाजन जळगाव ; 9860520560

सूचना - हे विचार लेखकाचे वैयक्तिक आहेत..

No comments:

Post a Comment