Tuesday, 23 August 2022

नवी उमेद परिवार तर्फे मानव चिल्ड्रन्स होम आश्रममधील मुलांसाठी आवश्यक वस्तूची भेट !

नवी उमेद परिवार तर्फे मानव चिल्ड्रन्स होम आश्रममधील मुलांसाठी आवश्यक वस्तूची भेट !


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              फेसबुक व व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच सहा मित्रांची संगत झाली आणि त्यातुन नवी उमेद नावाचा हा परिवार तयार झाला. या परिवार सदस्यांसाठी स्नेह संमेलन तथा सभासदांचे वाढदिवस एकत्र साजरे करून एक परिवार ठेवणे व काही छोटे मोठे कार्यक्रम साजरे केले जातात. त्याच प्रमाणे यावेळी सौ. अनामिका राजेश हळदणकर यांचा द्वितीय मुलगा कुमार सोहम हळदणकर याच्या वाढदिवसाच्या अनुसंगाघाने नवी उमेदच्या सर्व सदस्यांच्या मताने एका आश्रमाला भेट देऊन साजरा करण्याचे व नवी उमेद तर्फे आश्रमाला एक आवश्यक असलेली वस्तू देण्याचे ठरले. 


त्यानुसार कल्याण मधील साद फाऊंडेशनकडूनच्या मानव चिल्ड्रन्स होमसाठी एक फ्रिज भेट वस्तू देण्यात आली. सर्व मुलांनी आपली ओळख करून दिली आणि आलेल्या पाहुण्यांची ओळख करून घेतली आणि छानपैकी स्वागत केले. त्यानंतर सोहमचा वाढदिवस मोट्या उत्साहात साजरा करून त्याला त्यांनी बनवलेले बक्षीस दिले. नंतर आश्रमातील मुलांनी गाण्यांच्या ठेक्यावर छानसं नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. या आश्रमात वास्तव्यास असणारी मुले ही रस्त्यावर राहणारी, देहविक्री करणाऱ्या महिलांची आणि ज्यांचे पालक नाहीत असे मुलं या आश्रमात आहेत. या उपक्रम करताना संस्थेतील सर्व मुलांसहित तेथील कर्मचारी देखील आनंदित होऊन गेले. 


नवी उमेद या परिवार कडून संस्थेला जी भेट वस्तू देण्यात आली ती खूपच मोलाची आहे. कारण बरेच वर्ष ते याच्या प्रतिक्षेत होते आणि ती प्रतीक्षा सोहमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी उमेद या परिवाराने पुर्ण केली. यासाठी संगीता मसगे , चंद्रकांत राणे, श्री.सौ. रेखा निलेश कोकमकर, निकेश पोवळेकर, सुभाष नामगुडे,  सौ. श्वेता परब, प्रकाश मानतोडे, राजेश हळदणकर, सौ. अनामिका हळदणकर, सौ. प्रणाली साळगावकर, सौ. सोनाली शिरकर, श्री.सौ. स्नेहा संतोष पारकर इत्यादींनी आर्थिक योगदान दिले. आज आपला परिवार एकजूट आहे त्यामुळे हे शक्य झाले. कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन निलेश कोकमकर यांनी केले.त्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी सौ. संगीता सत्यम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या वेळी नवी उमेदचे सदस्य आणि साद फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते. हळदणकर परिवार आणि प्रणाली साळगावकर यांनी मुलांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली. अजुन काही वेळ आपल्या नवी उमेद परिवार सोबत घालवायची त्यांची इच्छा होती. तरी पण पुढच्यावेळी निदान स्नेहभेट जरुर द्यावी असे मत देखील व्यक्त केले. सरतेशेवटी निलेश कोकमकर आणि राजेश हळदणकर यांनी मुलांना थोडक्यात मार्गर्शन करून निरोप घेतला. ह्या पुढे हि असेच उपक्रम राबवू अशी इच्छा परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment