किसान सन्मानसाठी केवायसी बंधनकारक, सेवा केंद्रावर व संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध, कृषी अधिकां-याचे अवाहन !
कल्याण, (संजय कांबळे) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना यापुढे लाभ घेण्यासाठी ई केवायसी करावी लागणार आहे. याची मुदत ३१ आँगस्ट पर्यंत असून तालुक्यातील सेवा केंद्रावर तसेच संकेतस्थळावर स्वतः जावून सेवा केंद्रा वर बायोमेट्रिक सुविधेव्दारे ई केवायसी करता येणार आहे, केवायसी न केल्यास पुढील सर्व हप्ते थांबवले जाणार आहेत. त्यामुळे या सुविधाचा लाभ घ्यावा असे अवाहन कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश घोलप यांनी केले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात १ डिसेंबर २०१८ पासून अंमलबजावणी सुरू असून दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुंटूब लाभार्थी आहेत, प्रतिवर्षी सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात दिली जाते हा लाभ सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. पी एम किसान पोर्टलवरील नोदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना यासाठी संकेतस्थळावर ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध आहेत.
ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर ई केवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी १५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
पात्र लाभार्थ्यांना पुढील प्राप्त होण्यासाठी ३१ आँगस्ट पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता दिला जाणार नाही. असे निर्देश आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना सूचने प्रमाणे ई केवायसी पुर्ण करावी असे अवाहन कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश घोलप यांनी केले असून काही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास ८६००२५८५५० या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन कल्याण कृषी विभागाने केले आहे.

No comments:
Post a Comment