Monday, 22 August 2022

भिवंडीत चेन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरीच्या घटनात वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

भिवंडीत चेन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरीच्या घटनात वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !


भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर ) :
            भिवंडीत सध्या चेन स्नॅचिंगच्या व मोटर सायकल चोरीच्या घटनात दिवसांदिवस वाढ होत असल्या करणाने  भिवंडीत सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.अशाच प्रकारची एक घटना समोर आली असून यात दोन दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली आहे. ही घटना शहरातील अशोक नगरमध्ये घडली. चोरीच्या या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
.           दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी एक सुनसान रस्त्यावर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि ते फरार झाले आहे. महिलेने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोन्ही पळून जाण्यात यशस्वी ठरले.
            या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये  एक वृद्ध महिला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिच्या ओम साई इमारतीच्या खाली आली. मात्र, याचवेळी तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि दुचाकीवरून पळ काढला. यानंतर ही महिला असहाय्यपणे त्यांच्या मागे धावत राहिली. मात्र, ते दोन्ही सोनसाखळी चोर तिथून पळून गेले.
           गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथील चोरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काहीच भीती राहिली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच आपापली जबाबदारी स्वीकारावी असे मत सर्व सामान्यांना मधून व्यक्त होत आहे. असा प्रश्न या  निमित्ताने उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment