वसई, प्रतिनिधी : महिला संघर्ष समिती वसई तालुका अध्यक्ष पदी रूचिता नाईक यांची निवड महिला संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा रिनाताई जाधव यांनी केली.
रूचिता नाईक यांची सामाजिक बांधिलकी व समाजाची कळकळ आहे तसेच महिलांच्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असतात. रूचिता नाईक यांनी महिला आयोगा कडे मागणी करत पालघर जिल्हात महिलांच्या सुरक्षितेबाबत विशाखा समिती स्थापन करण्याबाबत आदेश काढण्यात मोलाचे कार्य केले.
नालासोपारा मधिल खुलेआम वेश्या व्यवसाय बंद करण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला. नालासोपारात महिलांसाठी स्वयंरोजगार आरोग्य शिबीर, मोफत धान्य वाटप, आधार कार्ड शिबीर नेत्र तपासणी शिबीर, पोस्ट ऑफीस योजना, आधार कार्ड, ई श्रम कार्ड शिबीर विविध उपक्रम राबवत असतात.त्यांचा उत्कृष्ट कार्य पाहिल्यानंतरच रूचिता अमित नाईक यांची महिला संघर्ष समिती वसई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

No comments:
Post a Comment