कामाख्या देवीला जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाला योग्य न्याय द्यावा - विद्याताई चव्हाण
मुंबई, अखलाख देशमुख, दि २४ : मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती अजून तरी इतकी अस्वस्थ बघितलेली नाही. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची भाजपाच्या मदतीने अट्टहासाने मिळवली. परंतु आता ही खुर्ची स्थिर राहील की नाही. ती अस्वस्थता त्यांच्या वागण्यातून, देहबोलीतून जाणवते. बुडत्याला का काडीचा आधार म्हणून येथे देवाला जा.. कामाख्याला जा, ज्योतिषकडे जा.. असे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी केली. यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे महत्त्व जाणतं चांगल काम करा. लोकं पुन्हा निवडून देतील. पण असे न करता लोकांना ढिगभर आश्वासन देयची आणि कोणतीच पूर्तता करायची नाही. यामुळे विश्वासार्हता राहत नाही. भविष्य बघण्यापेक्षा किंवा पुन्हा कामाख्या देवीला जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाला योग्य न्याय द्यावा, असे मत विद्याताईंनी व्यक्त केले.
कामाख्या देवी जादूटोणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखे असे त्या ठिकाणी जाणे व जादूटोणा यांसारख्या गोष्टीला प्रोत्साहन देणे योग्य नाही. मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती असे जादूटोणा, मंत्र तंत्र असे करत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment