Wednesday, 23 November 2022

" हा यू टर्न " आता चालणार नाही, सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला !

" हा यू टर्न " आता चालणार नाही, सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला !
 

भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर) :
           राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या वीज बीलाच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडले आणि " हा यू टर्न " आता चालणार नाही असा टोला लगावला आहे. राज्यात वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यावर सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे.
           या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना, मध्य प्रदेश सरकारचे कौतुक करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटींची शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली आहेत. त्यामुळे तात्कालिन महाविकास आघाडी सरकारला देखील शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्याचे आव्हान ते करत आहेत.
           तर दुसरा व्हडिओ अलीकडचा आहे. त्यात ते शेतकऱ्यांना वीजेची बिले भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आता ते आपल्या वक्तत्यावरुन घूमजाव करत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच नियमित वीज बील भरणाऱ्यांची वीज कापण्यात येणार नाही, त्यामुळे सर्वांनी चालू बिले भरावीत, असे फडणवीस म्हणत आहेत.
            राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यांच्याकडे सध्या खाण्यासाठी देखील धान्य शिल्लक नाही. त्यामुळे अनेकांचे वीज बील थकले आहे. त्यात राज्य सरकार आणि वसुली पथके शेतकऱ्यांकडून वीज बिले बळजबरीने गोळा करत आहेत.वीज बील भरु न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरील वीज कापण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी आणखीणच संतापले आहेत.

No comments:

Post a Comment