Wednesday, 23 November 2022

रेशन दुकानांवर गर्दी, मशिनचे सर्वर डाऊन !

रेशन दुकानांवर गर्दी, मशिनचे सर्वर डाऊन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २३ : 
शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांवर गर्दी दिसून येते आहे. ई-पोझ मशिनचे सर्वर डाऊन असल्याने कार्डधारकांचे थम घेण्यासाठी उशिर लागत आहे. मशिन चालू बंद होत असल्याने रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्डधारक उशीर लागत असल्याने रागावता. अन्न धान्य घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कार्डधारक या तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदारांना वेठीस धरत असल्याने त्रास होत आहे. मागिल तीन महीन्यांपासून सर्वर डाऊनचा त्रास आहे. म्हणून लाभार्थ्यांना वेळेवर अन्नधान्य वितरण करण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. कार्डधारकांना सुध्दा ताटकळत बसावे लागत आहे. हि समस्या प्रशासनाने लवकर सोडवली नाही तर महासंघ तीव्र आंदोलन करुन ई-पोज मशिन पुढील महीन्यात ऑफीसमध्ये जमा करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment