Monday, 24 April 2023

राज्यात तापमान वाढिचा परिणाम अंगणवाड्यावर, वेळेत बदल, महिला व बालविकास विभागाचा निर्णय !

राज्यात तापमान वाढिचा परिणाम अंगणवाड्यावर, वेळेत बदल, महिला व बालविकास विभागाचा निर्णय !

कल्याण, (संजय कांबळे) :;गेल्या ८/९ महिन्यापासून राज्यातील राजकीय वातावरण भयानक तापले असताना आता प्रत्यक्षात सुर्यदेव देखील जनतेवर कोपत असल्याने वाढत्या या तापमानाचा परिणाम अंगणवाड्यावर होत असून चिमुकल्यांना याचा नाहक त्रास होऊ नये म्हणून शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्या भरविण्याच्या वेळेत बदल केला असून त्या सकाळी ७:३० ते ११:३० असे करण्यात आले आहे. त्यामुळे बालकांना या धगधगत्या ऊन्हाचा चटका लागणार नाही असे वाटते.

ठाणे जिल्ह्यात १ हजार ८९४, अंगणवाड्या १ लाख २२ हजार ९५२ बालके, १ हजार ८९ सेविका, १ हजार ३७१ मदतनीस  आणि २७४ मिनी अंगणवाडी आहे, कल्याण तालुक्यात १२८ अंगणवाड्यामधून १४/१५ हजार बालके आहार घेतात. प्रारंभी काही अंगणवाड्या मधून थोडाफार भाग हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्यामुळे अंगणवाड्या कमी झाल्या. कल्याण तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्या या ग्रामीण व आदिवासी भागात आहेत. अशातच कल्याण, मुरबाड, शहापूर, आदी भागात सुर्य आग ओकत आहे. या परिसरात तापमान ४०/४२ अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याच परिस्थितीत खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात १०/१४ लोकांचा उष्माघात, चेंगराचेंगरी ने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सरकारवर सर्वच स्तरातून टिका झाली.

त्यामुळे यातून बोध घेऊन शासनाच्या महिला व बालविकास विभागाने राज्यातील वाढत्या तापमानाचे प्रमाण लक्षात घेऊन अंगणवाड्याच्या वेळेत बदल केले आहेत, त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील अंगणवाड्या या सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत भरतील, यामध्ये ७:३० ते ८ या कालावधीत सेविका गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे, इत्यादी कामे करतील, ८ ते १० या वेळेत प्रत्यक्षात बालके अंगणवाडीत उपस्थित असतील, या कालावधीत बालकांना पुर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, देण्यात येईल व १० ते ११:३० या वेळी सेविका गृहभेट असे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे. मात्र शहरी भागासाठी ते ८ ते १२ असे आहे.

या बाबतीत बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या सोबत बैठक घेऊन ही वेळ निश्चित केली आहे. यावर एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल यांची स्वाक्षरी असून राज्यातील सर्व संबंधित विभागाला हे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा चिमुकल्यांना ऊन्हाचे चटके बसणार नाहीत.

No comments:

Post a Comment