Friday, 21 July 2023

इर्शाळवाडीत सलग दुसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरु,मृतांचा आकडा १९ वर !

इर्शाळवाडीत सलग दुसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरु,मृतांचा आकडा १९ वर !

*भीतीने पसारवाडी ग्रामस्थांनी काढली जागून रात्र*

भिवंडी, दिं,२१, अरुण पाटील (कोपर) :
        इर्शाळवाडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आणखी दोन मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे. आज (दिं,२१) रोजी  या परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मात्र तरी देखील एन.डी.आर.एफ.च्या व टी.डी.आर.एफ. च्या जवानांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं आहे.
        काल इर्शाळवाडी दुर्घटने नंतर सर्व राज्यावर शोककळा पसरली आहे. या पश्चिम घाट पर्वत रांगामध्ये दर काही वर्षांनी भूस्खलनाच्या घटना घडत असतात. या इर्शाळवाडी दुर्घटने नंतर पुण्यातील मळीणला खेटून असलेल्या पसारवाडी गाव धोकादायक असल्याचे शासनाने जाहीर केल्याने ग्रामस्थानी कालची रात्र (दिं,२०) अक्षरश:जागून काढली आहे.
       बुधवारी घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे स्वतः पायी चालत घटना स्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. तसेच यतील मृतांना व जखमींना तत्काळ मदत जाहीर केली आहे.
        रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत १९ जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही ६० पेक्षा अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
         एनडीआरएफचे जवान भर पावसात मातीचा ढिगारा दूर करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. याच दरम्यान आज एकाच जागी दोन मृतदेह आढळल्यानं मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे.

No comments:

Post a Comment