Monday, 11 December 2023

लोक अदालत, कल्याण येथे कसूरदार वाहनचालकांच्या १२२५ प्रकरणांचा निपटारा !!

लोक अदालत, कल्याण येथे कसूरदार वाहनचालकांच्या १२२५ प्रकरणांचा निपटारा !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण न्यायालयात शहर वाहतूक शाखा, ठाणे शहर व मा. विधीसेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि. ०९/१२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. यात कल्याण, कोळसेवाडी व डोंबिवली उपविभागातील एकूण १२२५ खटले मा. लोकअदालत मध्ये निकाली काढून  आठ लाख बारा हजार सातशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.

प्रलंबीत असलेले दंड तडजोडीने मार्गी लागावेत म्हणून सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते, त्या नुसार कल्याण न्यायालयात शहर वाहतूक शाखा व मा. विधीसेवा प्राधिकरण यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोंबिवली उपविभागातील कसूरदार वाहनचालकांना प्रलंबित शुल्कात सवलत मिळावी यासाठी यासाठी आयोजन केले होते. त्या अनुषंगाने थकीत दंड प्रकरणी वाहनचालकांना खटला दाखलपुर्व नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. 

या कसूरदार वाहनचालकांना लोकअदालत मध्ये तडजोड शुल्कातून काही प्रमाणात सूट देण्यात आली, अशा कसूरदार वाहनचालकांवर खटले भरुन मा. न्यायालयात दाखल करून निकाली काढण्यात आले. यात कल्याण दाखल खटले ४१८/ दंड २,८८,८००, कोळसेवाडी दाखल खटले ४६९/ दंड ३०५५००, डोंबिवली दाखल खटले ३३८/ दंड २,१८,६०० असे एकूण दाखल खटले १२२५/ दंड ८,१२,७०० असा आहे.

सदर लोक अदालत डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार धर्माधिकारी,  सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक पोलीस, कल्याण, गिरीश बने पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक उपशाखा कल्याण, सचिन सांडभोर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक उपशाखा कोळसेवाडी, अजय आफळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली यांनी यशस्वीपणे पार पाडली.

No comments:

Post a Comment