Wednesday, 6 December 2023

शिवसेना (कल्याण शहर शाखा) व शिवकल्याण प्रतिष्ठान तर्फे बालसंवर्धन शिबीर - २०२३ चे आयोजन !!

शिवसेना (कल्याण शहर शाखा) व शिवकल्याण प्रतिष्ठान तर्फे बालसंवर्धन शिबीर - २०२३ चे आयोजन !!

कल्याण, प्रतिनिधी : शिवसेना (कल्याण शहर शाखा) व शिवकल्याण प्रतिष्ठान, कल्याण यांच्या तर्फे चार दिवसीय बालसंवर्धन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात एअरगन ने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षी निरीक्षण, कवायत, व्हॅली क्रॉसिंग, सर्प ओळख, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, रात्रीच्या वेळी शेकोटी सोबत धमाल अशा भरगच्च कार्यक्रमांनी शिबिराचे दिवस असतील.

शहरप्रमुख मा. नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले की अशा शिबिराचे आयोजन आवश्यक असते, या मुळे मुले आत्मनिर्भर होऊन त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते, तसेच जे शहरात राहून शक्य नाही अशा मैदानी खेळांचा आनंद लुटता येतो, मुलांमध्ये वाढलेला आत्मविश्वास व कणखर पणा हा त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

डिसेंबर महिन्यातील ख्रिसमस सणानिमित्त मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा या दृष्टीने हे शिबिर आयोजित केले आहे, हे शिबिर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी, मु‌. पो. कोंढाणे, ता. कर्जत, जिल्हा - रायगड येथे रविवार (२४ डिसेंबर २०२३) ते बुधवार (२७ डिसेंबर २०२३) या काळात आयोजित केले असून यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची वयोमर्यादा ८ ते १२ वर्षे आहे. 

या शिबिरातील प्रवेशासाठी - १) शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा, भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण (पश्चिम), २) ऑफिस क्र. १, तळमजला, साई शिवशंकर को.ऑ.हौ.सो.ली., रामबाग, लेन नंबर - ४, गुरुनानक शाळेसमोर, कल्याण (पश्चिम) येथे फॉर्म जमा करणे किंवा अधिक माहितीसाठी संपर्क - १) समिर देशमुख - 9975562311, २) योगेश पाटील - 9702698763, ३) ॲड. अनिकेत गुंजाळ - 9920133857

No comments:

Post a Comment