Saturday, 9 December 2023

पिंपरी चिंचवड मधे लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू !!

 पिंपरी चिंचवड मधे लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू !!


पुणे , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात असणाऱ्या एका स्पार्क कँडल बनवणाऱ्या कारखान्यात आग लागली. या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

तर १० जण गंभीर जखमींपैकी आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्या फुफ्फुसांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. फटका फॅक्टरी विनापरवाना सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. या कंपनीत वाढदिवसाच्या कँडल बनवण्यात येत होते. ही घटना शुक्रवारी (दि.8) दुपारच्या सुमारास घडली.

No comments:

Post a Comment