Wednesday, 6 December 2023

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ५/ड प्रभागात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मा.बसंत गर्ग, सह सचिव भारत सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न !

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ५/ड प्रभागात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मा.बसंत गर्ग, सह सचिव भारत सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न !

कल्याण , नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ५/ड प्रभागात *विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मा.बसंत गर्ग सह सचिव भारत सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या फ्लॅग शिप योजनांचे लाभ ‍लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविले जात असून, आज या अभियानाचा कल्याण पुर्वेतील शुभारंभ मा. स्थानिक आमदार गणपत गायकवाड, मा.बसंत गर्ग सहसचिव भारत सरकार, मिलिंद शंभरकर मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टेट हेल्थ अॅश्युरन्स सोसायटी, महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड, महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरीक बहुसंखेने उपस्थित होते. यावेळी डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तद्नंतर विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त "आपला संकल्प विकसित भारत" ही शपथ घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी ५/ड प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या स्टॉलवरील विविध योजनांची आगत्यपूर्वक माहिती घेतली. तसेच मा.बसंत गर्ग सह सचिव यांचे हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वितरीत करण्यात आले. ५/ड प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शासनाच्या डिजीटल व्हॅनच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहितीची चित्रफितही यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली.

No comments:

Post a Comment