Tuesday, 5 December 2023

कोकण महोत्सवात रंगणार कोकणातील समई महिला नृत्य कलापथकाचा कलाविष्कार !!

कोकण महोत्सवात रंगणार कोकणातील समई महिला नृत्य कलापथकाचा कलाविष्कार !!

*ब्राम्हणदेव महिला मंडळ (नाद भोळेवाडी) जपते ही लोककला*

मुंबई - ( शांताराम गुडेकर /दिपक कारकर )

कोकणात विविध लोककला लोकप्रिय आहेत आणि त्या पाहायला मिळतात. प्रत्येक तालुका/जिल्ह्यात त्या प्रांतानुसार तिथल्या लोककला आजही संवर्धित होताना दिसतात. अशीच एक महिलांनी सादर केलेली समई नृत्यकला *ब्राम्हणदेव महिला मंडळ अनेक वर्षे सादर करून रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील नाद, भोळेवाडी येथील एका छोट्याश्या आणि दुर्गम गावातील महिला ज्यांचे सरासरी वय जवळपास ४५-५० आहे, हि मंडळी आपली कला कोकण महोत्सव निमित्त मुंबईत स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदान, कोकण नगर बस स्टॉप समोर,भांडुप ( प. ) येथे शुक्रवार दि.८ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ७ वा.सदर नृत्य प्रकार सादर करणार आहेत.

आत्मविश्वास, शिस्तबध्द नियोजन, अतोनात प्रयत्न, नियमित सराव आणि विविध प्रकारच्या पैलू सादर करून सिंधुदुर्ग जिल्हात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळवत नृत्य कलेचं नावलौकीक केलं आहे. पाहण्यासारख्या आणि महिलांनी सादर करणाऱ्या कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सामाजिक सेवा मंडळ नाद, भोळेवाडी (मुंबई) तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment