Friday, 8 December 2023

कल्याण प्रभाग क्रमांक.२ मध्ये रस्त्याचे भूमिपूजन संपन्न !

कल्याण प्रभाग क्रमांक.२ मध्ये रस्त्याचे भूमिपूजन संपन्न !

कल्याण , सचिन बुटाला : कल्याण पश्चिममधील प्रभाग क्रमांक.२ मध्ये रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन आज कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निधीत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांच्या आणि विशेष निधीच्या तरतुदीतून येथे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जाणार आहे.

सदरचा हा रस्ता 'उंबर्डे मुख्य रस्ता ते साई ग्राम सोसायटी पर्यंत, साई सात्विक हॉस्पिटल ते मंगेश ड्रीम सिटी पर्यंत, कोळीवली येथील रामदास लोखंडे निवासस्थान ते मुकुंद लोखंडे निवासस्थान पर्यंत व कोळीवली येथील लोखंडे यांच्या दुकानापासून बंडू लोखंडे यांच्या निवासस्थानापर्यंत तयार करण्यात येणार आहे. दरम्यान या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले.

यावेळी या भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक मा.नगरसेवक प्रभुनाथ भोईर, मा. नगरसेवक जयवंत भोईर, शाखाप्रमुख रावसाहेब आहेर, डॉ. धीरज पाटील, रविकांत लोखंडे, बंडू लोखंडे, अनिल कारभारी, मनोज झुंझारराव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment