Tuesday, 24 March 2026

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे)खाडी किनारी बेकायदेशीर रेती साठ्यांवर तहसिलदारांची दिखाव्याची कारवाई !!

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे)खाडी किनारी बेकायदेशीर रेती साठ्यांवर तहसिलदारांची दिखाव्याची कारवाई !!

** मात्र त्याच दिवशी पुन्हा रेती उत्खनन, साठवणूक व वाहतूक सुरू, महसूल खात्याच्या संगनमताने सर्व सुरु असल्याचा दाट संशय 

** ग्रामस्थांचे आता पुढच्या कारवाईचे नाटक कधी, ग्रामस्थांचा सवाल

भिवंडी, दिं,२४ अरुण पाटील, (कोपर) :

          दिनांक 20/03/2026 रोजी मा. जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाळ साहेब ठाणे, मा. हरिश्चंद्र पाटील अप्पर जिल्हाधिकारी ठाणे, मा.उपविभागीय अधिकारी सानप साहेब यांच्या आदेशाने मा.श्री. अभिजीत खोले, तहसीलदार भिवंडी यांनी मौजे केवणी (दीवे) येथील रेती बंदर येथे कारवाई करून ५ सेक्शन व ८ बाज असा एकूण अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल  आग लावून नष्ट करण्यात आल्याचे महसूल खात्याकडून सांगण्यात आले आहे.
        मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी दररोज १५ ते २० सक्शन पंप व ८ ते १० बाज व एकाच वेळी ८ ते १० डंपर भरण्यासाठी ५ ते ७ जेसीबी यंत्रे त्या ठिकाणी नेहमी तैनात असतात. मात्र या ठिकाणी छापा टाकणार असल्याची माहिती संबंधित रेती/वाळू माफियाना महसूल खात्या कडूनच मिळाल्याने ही सर्व यंत्र सामुग्री व डंपर त्या ठिकाणाहून हलवल्याने कारवाई पाहिजी तशी झाली नाही. मात्र कारवाई झाल्या नंतर त्याच दिवशी पुन्हा नव्या जोमाने बेकादेशीर रेती उत्खनन, साठवणूक व वाहतूक सुरू करून रेती माफियांनी महसूल खात्याच्या कारवाईला फाट्यावर मारले.
        त्यामुळे आता अशीच कारवाई होणार की नाही व कधी होणार असा सवाल केवणी ( दिवे) ग्रामस्थांमधून निर्माण होत आहे.तर तेथील काही वरिष्ठ मंडळी व माजी सरपंच हे तर महसूल खात्यालाच आवाहन करत आहेत की, श्री .कृष्णा पांचाळ साहेब मा. जिल्हाधिकारी, ठाणे , मा.उप विभागीय अधिकारी (प्रांत) भिवंडी ,श्री. सानप साहेब, मा.तहसीलदार साहेब भिवंडी, श्री .अभिजीत खोल,व मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महसूल मंत्री ,महाराष्ट्र राज्य ,या महोदयांनी ही बेकायदेशीर रेती उत्खनन व बेकायदेशीर रेती वाहतूक बंद करून रेती माफियांवर फौजदारी गुन्हा दाखल करूनच दाखवावा असे खुले आवाहन केवणी (दिवे) गावचे ग्रामस्थ व माजी सरपंच करत आहेत.त्यामुळे येथील या सर्व रेती माफियांकडून या सर्व अधिकाऱ्यांना मोठा हप्ता तर जात नाही ना? असा सवाल आता ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता भिवंडी महसूल खाते कधी कारवाई  करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे 
        यावेळी खाडीमधून अनधिकृतपणे चोरी करून आणण्यात आलेली रेती खाडी लगत तयार करण्यात आलेल्या एकूण 12 कुंड्या मध्ये ठेवण्यात येत होती त्या 3 जे सी बी च्या सहाय्याने पूर्णत: नष्ट करण्यात आलेल्या आहेत. रेतीसाठा असलेल्या कुंड्या या मौजे केवणी सर्वेनं.181/ब क्षेत्र 08-03-61 हे.आर.प्र. हे राखीव वने अशी नोंद 7/12 सदरी असलेल्या जमिनीवर आहे. तसेच सदर जागेवर आज रोजी कांदळवनाची झाडे आहेत. त्यामुळे पर्यावरणचा  मोठया प्रमाणात ऱ्हास होत असून सदर रेती माफिया यांच्यावर वन विभाग कांदळवन संधारण घटक,  ठाणे यांच्याकडून गुन्हा नोंद करणेची कारवाई होणे आवश्यक आहे.
            भिवंडी परिसरातून दररोज बेकायदेशीर रेती/दगड/माती उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असून यात सर्वात जास्त व रोजच बेकायदेशीर रेती उत्खनन ,साठवणूक व वाहतूक होत असल्याने भिवंडी महसूल खात्याचे दररोज करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे  तालुक्याचे प्रमुख या नात्याने मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी, व मा.तहसीलदार महोदयांनी  या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष केंद्रित करून शासनाचा दररोज महसूल बुडवणाऱ्या रेती/दगड/माती माफियांवर कारवाई करून दंड संहित रक्कम वसूल करून या सर्वांनर फौजदारी गुन्हा दाखल करून आपली कायदेशीर दहशत निर्माण करावी, जेणे करून महसूल खात्या विरोधात जाण्याची व बोलण्याची कोणी हिंमत करू शकणार नाही.

             महसूल विभागाच्या  आजच्या कारवाई मध्ये अनधिकृत पणे रेती व्यवसाय करणारे रेती माफिया यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. सदर कारवाईसाठी मा. तहसीलदार श्री अभिजीत खोल, भिवंडी यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी खारबाव, श्री.सुधाकर कामडी, मंडळ अधिकारी अनगाव, मंडळ अधिकारी पडघा, अप्पर मंडळ अधिकारी श्री. राजेंद्र वंजारी, तसेच यांचे अधिनस्त सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच भिवंडी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली आहे. 

( भिवंडी येथील केवणी - दिवे खाडी किनारी महसूल खात्याने   केलेली कारवाई)

No comments:

Post a Comment