Saturday, 25 April 2026

श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा चिरनेर समितीच्या कार्यकारणी निवड !!

श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा चिरनेर समितीच्या कार्यकारणी निवड !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्ह्यात श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उरण मध्ये छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्ध नौका ग्रुप व ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या माध्यमातून साजरी केली जाते. यंदा १४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उरण तालुक्यातील चिरनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या उत्सवानिमित्त नुकतेच चिरनेर येथे संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत श्री छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सचिन केणी, कार्याध्यक्ष पदी योगेश गावंड,उपाध्यक्ष शैलेश चिर्लेकर ,सचिव ऋषिकेश कडू, सहसचिव मयुरेश सिंग, समन्वयक महेश केणी,सदस्य पृथ्वीराज कडू, सदस्य जित तांडेल सदस्य आदित्य केणी यांची निवड झाली आहे. श्री छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या या श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याच्या उत्सव समितीच्या विविध पदावर नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांवर शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे. हे सर्व पदाधिकारी, सदस्य श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

No comments:

Post a Comment