Sunday, 8 March 2026

ती... (एक समर्पित काव्य)

ती... (एक समर्पित काव्य)

स्त्री- अपेक्षविना घडविते विश्व,
प्रेमांकुराने समर्पिते सर्वस्व ।
अनुभवाची शिदोरी वाहते अखंड,
निंदा नालस्तीनेही त्रस्त असे *ती*

जगण्याची आणि जगविण्याची आशा प्रचंड,
आयुष्याशी ही करते बंड।
माया आणि ममतेचा त्रिखंड
मृत्यूला ही शाश्वत नमविते *ती*

नातेसंबंधांची राखणदार,
स्त्रीत्वाचे प्रेम असते अपरंपार।
काबाडकष्ट अनेक करता
स्वतःला सावरणे विसरते *ती*

कधी रामाची वैदेही, कधी गणेशाची रिद्धी सिद्धी, कधी शंकराची पार्वती, तर कृष्णाची राधा राणी,
त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते ती।

*त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते *ती*।

 - सौ.शिल्पा चंद्रकांत निमकर 
घाटकोपर मुंबई.

No comments:

Post a Comment