Monday, 16 March 2026

वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्थेची महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक संपन्न !!

वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्थेची महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक संपन्न !!

कल्याण, प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयात वालधुनी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीस वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री.सुनील सिताराम उतेकर, प्रमुख मार्गदर्शक श्री. शशिकांत दायमा तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री.निशांत उर्फ बबली कांबळे, श्री.गणेश शंकर कांबळे, श्री.सुरेश भिवाजी आहेरे आणि माननीय विलास सुत्रे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान वालधुनी नदी प्रदूषणमुक्त कशी करता येईल, यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करून नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.

यावेळी अधिकाऱ्यांनी उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण या तीन टप्प्यांमध्ये नदी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून त्याची पूर्वसूचना लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच वालधुनी नदी स्वच्छतेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्था संयुक्तरित्या शासनाकडे सतत पाठपुरावा करणार असल्याचेही ठरविण्यात आले.

यानंतर या विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त, माननीय महापौर मॅडम आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या संयुक्त उपस्थितीत लवकरच एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील उतेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...