Thursday, 12 March 2026

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण शहरातील वालधुनी नदी पुनर्जीवित व प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपायुक्त श्री. रामदास कोकरे व कार्यकारी अभियंता यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील उतेकर व प्रमुख मार्गदर्शक श्री. शशिकांत दायमा उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने उपायुक्त श्री. रामदास कोकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व महानगरपालिकेकडून नदी स्वच्छतेसाठी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

*बैठकीदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या*

वालधुनी नदीतील साचलेला गाळ तातडीने काढण्यात यावा

नदीची रुंदी वाढविण्यात यावी

नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात

नदीच्या काठावर झाडे लावून हरित पट्टा निर्माण करावा

नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सूचना फलक लावावेत

काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

संपदा रोड परिसरापासून सुमारे २०० फूट परिसरातील नदीकाठावर साचलेला कचरा व रॅबिट तातडीने हटविण्यात यावा

या बैठकीस श्री. अनिल सरदार, श्री. विशाल उर्फ बबली कांबळे, श्री.सुरेश आयरे, श्री. दिलीप आत्माराम गायकवाड, सौ. सुरेखा दिविलकर, सौ. प्रेरणा शिरसाट, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. राजा भोसले तसेच संबंधित विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी अध्यक्ष श्री. सुनील उतेकर यांनी सर्व अधिकारी व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment