खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे जेएनपीए मधील G.M.A. ह्या सर्वोच्च पदावर नोकरी मिळविली !!
** 'मनिषा उमाकांत जाधव' यांना तत्काळ निलंबित करून जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी
लक्ष वेधण्यासाठी ॲड सिद्धार्थ इंगळे यांचे लाक्षणिक उपोषण
उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीए मधील G.M.A. ह्या सर्वोच्च पदावर कार्यरत असणाऱ्या मनिषा उमाकांत जाधव यांचा परिचय उरण तालुक्यातील सर्वांनाच आहे. त्यांनी सन १९९४ मध्ये जेएनपीए मध्ये अनुसूचित जाती ( SC) प्रवर्गातील राखीव असलेल्या महिला कल्याणकारी अधिकारी( वुमेन्स वेल्फेअर ऑफिसर) ह्या पदावर नोकरी मिळविताना अनुसूचित जाती ( SC) प्रवर्गाचे खोटे जात सादर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी अनुसूचित जाती SC प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र देखील मिळवल्याचे दिसून येत आहे.
'मनिषा उमाकांत जाधव' यांचे लग्नापूर्वीचे नाव 'मनिषा अभिमन्यू वळवी' हे असून त्यांच्या वडिलांचे नाव अभिमन्यू नुरजी वळवी हे आहे. अभिमन्यू नुरजी वळवी हे आदिवासी समाजातील अनुसूचित जमाती ( ST) प्रवर्गातील हिंदू भील ह्या जातीचे असून सन १९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या तळोदा जिल्हा नंदुरबार ह्या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अभिमन्यू नुरजी वळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी म्हणून मनिषा उमाकांत जाधव यांचे नाव सात बारा मधे दाखल केले असून त्या सात बारा मधे आदिवासी खातेदार असा स्पष्ट उल्लेख आहे. मनिषा जाधव यांनी जेएनपीए ला दिलेल्या लेखी खुलास्यामध्ये आपले वडील अनुसूचित जमाती ( ST) प्रवर्गातील असल्याचे स्वतः कबूल केले आहे. मनिषा जाधव यांचे चार भाऊ संदीप, युवराज, हर्षल, प्रशांत यांचे जात वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , जात प्रमाणपत्र पाहिले असता त्यांची जात देखील वडिलांप्रमाणे अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील हिंदू भील असल्याचे दिसून येत आहे. यावरून मनिषा जाधव यांची जात अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील हिंदू भील असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु मनिषा जाधव यांनी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचे खोटे जात प्रमाणपत्र सादर करून जेएनपीए मध्ये नोकरी मिळविल्याचे स्पष्ट होत आहे. सदर सर्व पुरावे जोडून ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी जेएनपीए चे चेअरमन गौरव दयाळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात स्मरणपत्र देखील दिले होते. वास्तविक पाहता अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर जेएनपीए ने स्वतःहून आवश्यक चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु जाणीवपूर्वक व हेतू पुरस्सर त्यांनी आवश्यक ती चौकशी केली नाही म्हणून ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जेएनपीए ने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र जोडल्याचे निदर्शनास आल्यावर स्वाधिकारे चौकशी करून अनेक प्रकल्पग्रस्तांना सेवेतून बडतर्फ केले आहे. मग मनिषा जाधव यांना देखील तोच नियम लागू होणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.असे ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.या संदर्भात मनीषा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
No comments:
Post a Comment