Wednesday, 13 May 2026

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्या नागरिकांना पोस्ट कार्यालयाच्या व्यवहारासाठी जेएनपीटी टाऊनशिप येथे जावे लागत होते. पूर्वी उरण शहरात असलेले पोस्ट कार्यालय जेएनपीटी टाऊनशिप येथे हलविल्याने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्त्रिया आदी व्यक्तींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र हे जेएनपीटी टाऊनशिपला असलेले कार्यालय पुन्हा पूर्वी प्रमाणे उरण शहरात कार्यरत होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


उरण शहरातील आनंदनगर येथील जुन्या पोस्ट कार्यालयाची इमारत पुनर्विकासासाठी गेल्यानंतर हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जेएनपीटी शॉपिंग सेंटर येथे हलविण्यात आले होते. मात्र, शहरापासून दूर गेलेल्या या कार्यालयामुळे नागरिकांना अतिरिक्त प्रवास खर्च, वेळेचा अपव्यय आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, लवकरच उरण शहरात नव्या ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कामठा रस्त्यावरील शामियाना हॉटेलसमोरील युनियन बँकेच्या वरच्या मजल्यावर हे पोस्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, बचत खाते, मनीऑर्डर, पोस्टल व्यवहार तसेच विविध शासकीय कामांसाठी वारंवार पोस्ट कार्यालयात जावे लागते. महिला वर्गालाही दैनंदिन व्यवहारांसाठी मोठी गैरसोय होत होती. आता पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.उरण शहरात पोस्ट कार्यालय सुरु होणार असल्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची, श्रमाची बचत होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर उरण शहरात पोस्ट कार्यालय सुरु करावे अशी मागणी केली 

No comments:

Post a Comment

पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावी आयुक्तांचे आदेश !!

पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावी आयुक्तांचे आदेश !! कल्याण, संदीप शेंडगे ...