Saturday, 19 June 2021

मुरबाड मध्ये खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरेंच्या हस्ते व्रुक्षारोपनाचा शुभारंभ !!

मुरबाड मध्ये खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरेंच्या हस्ते व्रुक्षारोपनाचा शुभारंभ !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : **माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ** दिनांक १८ जुन रोजी मुरबाड नगर पंचायतीच्या वतीने आयोजित व्रुक्षारोपन कार्यक्रमासाठी खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरेंच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. भविष्यात मुरबाड हे एक कँपिटल शहर असेल. जिथे शुद्ध हवा, पाणी, रस्ते, उद्योग, निसर्ग रम्य पर्यटनस्थळे हि आधुनिक पद्धतीने विकसित झालेली शहरवासीयांना पहावयास मिळतील, मुरबाडकरांना कुठे कसल्या गोष्टींची उणीव भासु नये. 


यासाठी कार्यसम्राट खासदार कपिल पाटील व कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांनी कंबर कसली असुन मुरबाड शहरासह तालुक्याचा चहुबाजूंनी विकास होत असल्याचे दिसून येत आहे. मुरबाड शहरात बागेश्वरी हे तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी एक सुंदर असे पर्यटनस्थळ विकसित होत असुन, जिथे सुंदर आणि शुद्ध पाण्याचा तलाव, रस्ते, रस्त्याच्या कडेला मनमोहक अशी फुल झाडे, फळझाडे, लावून आकर्षण वाढवण्यासाठी नगरपंचायत पुढे  सरसावली असुन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, यांनी स्वच्छ ,सुंदर व हरित मुरबाड शहरासाठी,, **माझी वसुंधरा मोहिमे अंतर्गत व्रुक्षलागवड व संगोपण हाती घेतले आहे. तर दुसरीकडे मुरबाड करांना हरवत चाललेल्या काही दुर्मिळ वनस्पती व शुद्ध हवेसाठी वनखात्याने भव्य असे आँक्सीजन पार्क उभे केले आहे. यामुळे मुरबाड शहराच्या सौंदर्यात आणखीन भर पडत असुन, आजच्या या व्रुक्षरोपन कार्यक्रमासाठी खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, मुरबाड न.प.चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव, शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे यांसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment