रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात !
ठाणे, दि. २१ : अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. शनिवारीपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. पाऊस सुरुच राहिल्याने मुंबई, ठाणे, पालघर येथे पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर असाच कायम राहील्यास येथील सखल भाग पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे.


No comments:
Post a Comment