Tuesday, 20 July 2021

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ६० लाखांवर ! राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं!

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ६० लाखांवर ! राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं!



मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज ६, ९१० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख ९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे.

राज्यात आज १४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ७५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०७ टक्के झाला आहे. तब्बल ४१ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ९४, हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment