Tuesday, 20 July 2021

नदी, नाल्याचे पुर आले धाऊन खड्डे, खडी आणि डांबर गेले वाहून? कल्याण मुरबाड रस्त्याची झाली चाळण !

नदी, नाल्याचे पुर आले धाऊन खड्डे, खडी आणि डांबर गेले वाहून? कल्याण मुरबाड रस्त्याची झाली चाळण !


कल्याण, (संजय कांबळे) : रविवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे छोटे मोठे नाले,गटारे आणि नद्यांना पुर आला होता. यापुरामुळे खड्डे, खड्यातील खडी आणि थोडेफार टाकलेले डांबर या पाण्यात अक्षरशः वाहून गेले. त्यामुळे कल्याण मुरबाड महामार्गाची चाळण झाल्याचे चित्र पाणी निघून गेल्यावर दिसत आहे.


कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल या दोन ते तीन किलोमीटरच्या दरम्यान सुमारे शेकडो खड्डे पडलेले आहेत,या विरोधात बातम्या आल्या आवाज उठविल्यानंतर तात्पुरते खड्डे भरले जातात व पुन्हा जैसे थे, गेल्या कित्येक महिन्यात खड्यांचाच अनुभव वाहनचालक व नागरिक घेत आहेत.

आता दोन दिवसापासून कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे उल्हास नदी दुथडी भरुनी वाहते आहे,तर म्हारळ, वरप,कांबा या गावांच्या आजूबाजूच्या डोंगर व टेकड्या वरून छोटे मोठे नाले,ओढे,गटारे पुराप्रमाणे वाहत होते, पावशेपाडा बस स्टाप कडून येणारे पाणी हे या रस्त्यावरुन रस्ता क्राँसकरुन वाहत होते,तर टाटा पावर हाऊस इकडून व तलावाकडून येणारे पाणी हे सपना लाँस कडे याच रस्त्यावर वाहत होते,पुढे राधा स्वामी संत्संग जवळ हीच परिस्थिती, तर बंजरंग हार्डवेअर ने नाल्याला अडथळा निर्माण केल्याने येथे तर नदीचेच स्वरूप प्राप्त झाले होते, येथे कल्याण मुरबाड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे, पुढे ओमकारनगर, म्हारपाडा, थारवानी,रिजेन्सी येथे तर तलावच पसरला होता ,या पाण्यामुळे खड्डे, खड्यातील खडी, आणि कुठेतरी टाकलेले डांबर वाहून गेले होते, एक ते दिडफुट खड्डे पडले होते पाणी. ओसरल्त्यायानंतर येथील कल्याण मुरबाड रस्ता एखाद्या कुपोषित बालकाप्रमाणे दिसत होता,दुर्दैवाची बाब म्हणजे याच रस्त्यावरुन मंत्री, आमदार, खासदार, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, उपसभापती, झेडपी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, गल्ली बोळातील स्वंयमघोषित पुढारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते आदी लोक जा ये करतात, परंतु त्यांना हे खड्डे काय दिसत नाही, हे विशेष नव्हे काय? त्यामुळे वेळीच उघडा डोळे, बघा निट व रहा फिट.

No comments:

Post a Comment